This article is translation of a pravachan given by jain Guru shree Dhyansagarji maharaj.(book-kaivalya chandane)
In this pravachan maharaj tells us about theory and practicle of true dhyaan.
वैराग्य, तत्वविज्ञान, निष्परीग्रहता, समताभाव आणिकष्टसहिष्णुता या ध्यानाच्या सामग्रीचा द्रव्यसंग्रहात उल्लेख आहे. यांच्याशिवाय खरे ध्यान नाही. वास्तविक ध्यानाचा कोणताही विधी नाही. विधी जो काही असेल तो सीमित असेल आणि सीमित असीमाला स्पर्श नाही करू शकत. विधींमुळे फारतर आपण धारणेपर्यंत जाऊ शकतो. वर्णन ऐकून कल्पनाशक्तीच्या सहाय्याने उडण्याचा प्रयास केला तर खूप दूर जाऊ शकतो. आता आपल्याला माहिती आहेकी आत्मा शांत, निराकार, चैतन्यस्वरूप आनंदमय आहे. आपल्याजवळ फक्त हे शब्द आहेत. चिंतन करता करता प्रसन्नतेचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. पण त्याला आत्मसाक्षात्कार किंवा ध्यान समजू नका. कधी प्रकाशाची जाणीव होते. शरीर हलके हलके वाटू लागते.पण जर त्या स्थितीला आपण ध्यान समजून बसलात तर जे वास्तविक ध्यान आहे त्यापासून आपण वंचित रहाल. वास्तविक ध्यान ही अशी गोष्ट आहेकी तिला स्पर्श करणारा दुनियेतल्या इतर कोणत्याही वस्तूला पसंत नाही करत.
समजा आपण अगरबत्ती लावली आणि ध्यानाला बसलात. ध्यान संपले आणि आपल्याला वाटले, वा! आज ध्यान किती छान लागले. किती सुवासिक अगरबत्ती होती. तर निश्चित समजाकी ते ध्यान नव्हते. ध्यानाचा रस प्राप्त केल्यानंतरही अगरबत्तीचा सुगंध चांगला वाटू लागला तर ते खरे ध्यान नाही. ध्यानाचा खरा रस प्राप्त केलात तर त्यापुढे अगरबत्तीचा सुगंध नक्कीच फिका वाटू लागेल. जर आपण ध्यान संपवून जेवायला बसलात, खूप भूक लागली आहे आणि भोजनात खूप स्वादिष्ट पदार्थ आहेत. आपण ते खाऊ लागलात आणि खूप मजा येऊ लागली तर समजा ध्यानाचा ‘तो’ आनंद आपण प्राप्त केलेला नाही. जो समजतोकी मी ध्यानाच्या अगदी खोलीत जाऊन पोहोचलो आहे तर खरोखरच तो वास्तवात तसा गेला आहेका? जेवढे कोणी ध्यानात रस घेणारे लोक आहेत त्यांनी पहावेकी आपल्याकडे वरील पाच गोष्टी आहेतका?
जीव सिद्धांतानुसार शरीर जीव नाही आणि जीव शरीर नाही. एखाद्याच्या मृत्युनंतर आपण म्हणतोकी, तो गेला आणि मागे त्याचे शरीर राहिले. त्यावेळी कळतेकी जीव आणि शरीर दोन आहेत. पण जिवंतपणी जर कोणी समजून घेतलेकी जीव आणि शरीर भिन्न आहेत तर मात्र ती बुद्धीमानी ठरेल.
आता जर कोणी आपल्या मुलाला थप्पड मारली आणि म्हणाला, ‘थप्पड तर मी त्याच्या शरीराला मारली त्याला नाही,’ तर मग कसे वाटेल? पूर्ण लोक व्यवहार ठप्प होऊन जाईल. लौकिक व्यवस्था बिघडेल. मुंगीला चालताना बघितले तर तो जीव आहे. पण जे दिसते आहे तो जीव नाही. तो परमाणूंचा स्कंध आहे. पण जगताचे हे एक प्रचलन आहे की व्यवहारात जगत असताना जीव आणि शरीर एक मानूनच चालावे लागते. नाहीतर मग लौकिक व्यवहार बिघडून जाईल.
काहीजण व्यवहारात कर्मात्मा आणि मंदिरात धर्मात्मा असतात. पण या जगतात असे कोणते स्थान आहेकी जेथे भगवान नाहीत. जो जैन आचरण पद्धती आचरतो त्याचे आचरण मंदिरात आणि मंदिराबाहेरही समान असते. धर्मसभा ही थेअरीचा वर्ग असते आणि बाहेरचे जग ही प्रयोगशाळा असते. इथे या वर्गात तुम्ही ऐकता की मनाला विशुद्ध कसे बनवायचे? मग ही गोष्ट तेव्हाच उपयोगी पडेल जेव्हा तुम्ही धर्मसभेच्या बाहेर असता, जेव्हा तुम्ही ती गोष्ट आचरणात आणाल. जेव्हा तुम्ही व्रतांचे पालन कराल.
काही पापे अशी असतातकी ज्याला फक्त फक्त दोघेच जाणतात. आपण स्वत:आणि भगवान! इथे मनाच्या पवित्रतेसंबंधी ऐकून गेलात आणि बाहेर जाऊन भांडण तंटा सुरू केलात तर काय उपयोग त्या ऐकलेल्या शब्दांचा? म्हणून स्वत:च्या पवित्रतेवर लक्ष द्यायला हवे. ऐकलेल्या गोष्टी, शब्द तेव्हाच उपयोगी पडतात जेव्हा पवित्रता जीवनाशीही निगडीत असते. म्हणून जर पापापासून वाचायचे असेल तर लक्षात ठेवाकी, जर आपला जन्म झाला आहे तर मृत्यूही निश्चित आहे. मृत्यूचे स्मरण आपल्याला पापापासून वाचवते. श्रीमद राजचंद्र हे मोठे विद्वान होते. अहिंसेसंबंधी त्यांच्यात आणि गांधीजींच्यात काही प्रश्नोत्तरे झाली. शेवटी गांधीजी त्यांच्या उत्तराने संतुष्ट झाले. महात्मा गांधींनी लिहिले आहेकी, “आजपर्यंत मी कुठल्याही परिपूर्ण पुरुषाला पहिले नाही पण परिपूर्णतेच्या अगदी निकट स्थानी असलेल्या व्यक्तीला मी भेटलो आहे. ती व्यक्ती म्हणजे श्रीमद राजचन्द्र!’
श्री मद राजचन्द्र म्हणाले होते, ‘लोक म्हणतात, वैराग्य येताच नाही. तर मग तीन गोष्टींचे स्मरण ठेवावे. त्या अशा,
१-मृत्यू डोक्यावर सदैव भिरभिरत असतो.
२-पाऊल ठेवताच पापाला प्रारंभ होतो.
३-बघितल्याबरोबर विष चढते.
आता यातली पहिली गोष्ट अशीकी, असे मानायचे की मृत्यू सदैव डोक्यावर भिरभिरत असतो. डोक्यावर सतत मृत्यूची टांगती तलवार असेल तर आपण नक्कीच पाप नाही करणार. कोणाला जर सांगितलेकी, तू तीन दिवसात मारणार आहेस तर तो काय करेल? तो वैद्याला बोलावेल की देवाचे नाव घेईल? तो लूटमार करेल की काही चांगलं काम करेल?
आता यातली दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी पाऊल ठेवताच पापाला प्रारंभ होतो. म्हणजे तुम्ही सकाळी उठलात. मंदिरात जाण्यापूर्वी मुखशुद्धी करण्यासाठी मंजन करणे चालू केले. आता काही मंजन किंवा टूथपेस्टमध्ये काय असते? असे द्रव्य असतेकी जे हाडांपासून बनवलेले असते. काही पापे समजुन उमजुन केली जातात तर काही नकळतपणे केली जातात. अलीकडे वस्तुंच्या पाकिटावर तपकिरी आणि हिरव्या रंगांची चिन्हे येऊ लागली आहेत. पण काहींच्या मते तीसुद्धा शत-प्रतिशत विश्वसनीय नसतात. इंटरनेटवर एक पान आले होते. त्यात लिहिले होतेकी, सरासरी एका चोकलेट बारमध्ये किड्यांचे आठ पाय असतात. म्हणून जर आपण सत्याच्या मार्गावरून चालू इच्छित असाल तर आधी स्वत:शी प्रामाणिक राहा. फक्त दाखवण्यासाठी काही कराल तर आपला उद्धार नाही होणार. आपण स्वत:बद्दलच्या वाईट गोष्टी सांगू इच्छित नाही. चुकीचे असूनही बरोबर दाखवण्याची कुशलता तर सर्वांकडे असते.
तिसरी गोष्ट म्हणजे बघितल्याबरोबर विष चढते. रागद्वेषरुपी किंवा आणखी कसले कसले कषायरुपी विष चढू लागते. मग आर्त किंवा रौद्र ध्यान सुरू होते. कोठून येते हे आर्त-रौद्र ध्यान?
कोणी प्रवचनाला उशिरा येऊन आपल्यासमोर बसला तर आर्तध्यान सुरू होते. पण मग समोर एवढी जागाच कशाला सोडलीत? कोणासाठी जागा सोडली होती तो आलाच नाही आणि दुसराच कोणी येऊन बसला. मग चालू होते दुर्ध्यान! कसे येईल मग वैराग्य? पाहिल्याबरोबर विष चढते हा तर आपल्या दृष्टीचा दोष झाला.
नजरमे प्यार हो माँ का, सभी बच्चे नजर आते
अगर हो खोट भीतर तो, बहन भाई खटक जाते
सरल है जुर्म करना चुकाना है बडा भारी
अटल कानून कुदरत का सभीकी एक दिन बारी
सगळ्यांचीच एक दिवस वेळ येणार आहे. कोणी नाही वाचणार. मृत्यूपासून पळणारा त्यापासून वाचू नाही शकणार. अनेक दार्शनिकांनी जगण्याच्या कलेवर प्रकाश टाकला आहे. पण जिनेन्द्र प्रभूंनी मरण्याच्या कलेवरही प्रकाश टाकला आहे. त्यामुळे आपण सदैव पापापासून विन्मुख राहतो. म्हणून वरील तीन गोष्टींचे स्मरण केले तर वैराग्य दूर नाही.