-
चाल – CHAAL
फुले गुलाबी लाल दलांची किती स्तुती रिचवाल दलांची कवी मनाचे वेड जपाया कुणी बदलली चाल दलांची सुसाट दौडे अश्व कड्यांवर कशास ठोकू नाल दलांची कुठे कशाला भेट भटकणे नको नको ती ढाल दलांची दले सुनेत्रा वेच तळीची विणावयाला शाल दलांची
-
पूज्य – PUJYA
मोक्षलक्ष्मी अंतरीची मम सुनेत्रा नित्य दर्शन देय मज आतम सुनेत्रा पुण्य पाठी रम्य सृष्टी थांबलेली आत्मश्रद्धा सावरे कायम सुनेत्रा रान हिरवे नभ निळाई पांघरोनी भाव अक्षर वाचते आगम सुनेत्रा भूत सुंदर बिंब सुंदर नेत्र मिटता वर्तमानी कोंडतोना दम सुनेत्रा पुष्पमाळा अष्टद्रव्यें पूज्य मूर्ती शुद्ध हृदयी गा सुनेत्रा रम सुनेत्रा
-
गजरा – GAJARAA
जास्वंदीचे झुमके भारी कंकण बिलवर तोडे भारी भूमीवरचे लाल गुलाबी गुलाब पिवळे खमके भारी बकुळ फुलांच्या तळी साठले अत्तर घन मातीचे भारी वाटिकेतल्या सरोवरातिल कमळ फुलांवर भुंगे भारी झेंडू चाफा सदाफुलीचा वावर रानामध्ये भारी जुई चमेली शेवंतीची गजरा फांती माळे भारी चेरी ब्लॉसम लिली डेलिया मैत्री डेझी संगे भारी
-
बहावा – BAHAVAA
KATHA बहावा … असा बहावा पैस फुलावा डोंगरमाथी अथवा दारी आईदादा फुलांत हसता मेघांनी शिंपावी झारी .. Ghazal गझल… मी मात्रा ऐशी मंत्रात वळे जादुई वीज नभी जैशी मंत्रात वळे जादुई देऊनी तडका तोऱ्यात निघाली बयो धन दर्शन तैशी मंत्रात वळे जादुई कोणी तिज कळवा दिसते ती आता तरी हसताना कैशी मंत्रात वळे जादुई कुंकू…
-
पीकुसो – PEEKUSO
पीत बहावा !! खडा दुपारी !! ग्रीष्मासंगे !!! डोंगर माथी अथवा दारी !! ग्रीष्मासंगे !!!! आई दादा ! फुलांत हसण्या !! पिवळ्या हळदी !!! शिंपावी जलदांनी झारी !!! ग्रीष्मासंगे !!!! ….. कुल मार्जारी ! मस्त कलंदर !! मस्त कलंदर !!! भाव बोलती ! किती बिलंदर !! मस्त कलंदर !!! चित्र बोलते ! रेषा ओढत !!…
-
आगगाडी – TRAIN (AAGA-GAADEE)
आभाळ उतरून आल बाई आल बाई वाफेच इंजीन झाल बाई आल बाई रांगेत रंगीत देवघेवी चालताती पाहून दुहितेच हाल बाई आल बाई नाचेल सौदामिनी कशाला आगगाडी कोंडून सारे सवाल बाई आल बाई मोटार यांत्रीक खेचता वाऱ्यास वेगे उडवीत चेंडू खुशाल बाई आल बाई गागाल गागाल गालगागा गा सुनेत्रा ऐशी लगावून चाल बाई आल बाई
-
गझल – GHAZAL
चार मुक्तके मुक्तक … मर्गळ मुरगाळून जिंकले कर्दळ कुरवाळून जिंकले मुक्तक लिहुनी शीघ्र राधिके दर्वळ चुरगाळून जिंकले बरखा … बारिश गिरी बारिश गिरी मेघ बरखा साजिश गिरी बाढ आयी गोंड बनसें नीर लौकी ख्वाहिश गिरी वर्धमान … पंचरंगी ध्वज हमरा वीर तीर्थंकर हमरा वर्धमान जिनअनुयायि आत्मधर्मी हर हमरा गझल … गझल चारु चंद्रमा नयन तारु…