ठेव गुलदस्त्यात गझला खास काही
प्राशुनी बघ चिंब भिजले भास काही
लेखणीतून शब्द झरती भाव भरले
कागदावर उमटता निःश्वास काही
पावले डौलात टाके गझल माझी
फरपटे ना रचत जाते न्यास काही
ओतल्या मकरंद धारा मास तेरा
राहिले बाकी तरी मधुमास काही
जिंकला विश्वास माझा दैव हरले
जीव जगण्या पुरुन उरले श्वास काही