Category: Article

  • याचसाठी केला अट्टाहास(कथा) आस्वादात्मक समीक्षा – YAACHASAATHEE KELAA ATTAAHAAS

    साहित्य कोणतंही असो, हिंदू धर्मियांचं असो, ख्रिस्ती धर्मियांचं असो, बौद्ध धर्मियांचं असो, मुस्लिम धर्मियांचं असो, आदिवासींचं असो, वैदिकांचं असो, श्रमणांचं असो, स्त्रीवादी, पुरुषवादी, ग्रामीण, अभिजनवादी वा प्रादेशिक असो त्या सर्वातून दिसणारं धर्माचं स्वरूप सापेक्ष असतं. … याचं कारण धर्म म्हणजे ज्यानं त्यानं स्वतःच्या प्रवृत्तीनुसार, कुवतीनुसार प्रकृती किंवा निसर्गाच्या हाकेला दिलेली साद असते. Nurture to Nature…

  • देऊळ कथा आस्वादात्मक समीक्षा – DEOOL

    ‘देऊळ ‘ ही प्रा. डी. डी. मगदूम यांनी लिहिलेली कथा रूढ अर्थाने एक समकालीन मराठी जैन कथा असली तरीही मला मात्र तिला एक नवकथा असे म्हणावेसे वाटते. ज्येष्ठ समीक्षक गंगाधर गाडगीळ आपल्या ‘ नवकथेचे स्वरूप ‘ या लेखात म्हणतात, ” वाङ्मयातील काही विशिष्ट प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या कथेला नवकथा हे नाव देणे अप्रस्तुत आहे, कारण आज…

  • दर्शन ललित कथा आस्वादात्मक समीक्षा – DARSHAN

    मराठी काव्यामध्ये केशवसुतांनी रोमँटिसिझम (स्वच्छंदतावाद) आणला आणि आपल्या एकूणच साहित्यात रोमँटिसिझम हळूहळू मूळ धरू लागला. ललित वाङ्मयाचे प्रमुख ध्येय आनंद निर्मिती हेच असल्याने हा स्वच्छंदतावाद ; अविष्कार स्वातंत्र्य म्हणून ललित वाङ्मयाच्या अगदी हृदयस्थानी जाऊन बसला. माणूस वयाने ज्ञानाने कितीही वाढला तरी त्याला कल्पनेत रमायला आवडते. माणसातली निरागसता, शैशव त्याला कल्पनेत रमायला भाग पाडते. मग त्याच्या…

  • वर्ज्य ललित कथा आस्वादात्मक समीक्षा – VARJYA

    ‘ पिंछी कमंडलू ‘ या ग्रंथात धर्म आणि पंथ यासंबंधी आचार्यश्री विद्यानंद मुनी महाराज म्हणतात, “धर्म आणि पंथ यात मौलिक अंतर आहे. पंथ व्यक्तिवादी विचारधारेला उचलून धरतो. तो सत्यांशाला पूर्ण सत्य समजतो. धर्म वस्तुस्वभावाचे निरूपण करतो. तो त्रिकालाबाधित असतो. धर्म एकरूप असतो तर पंथ अनेकरूपी असतो. पंथ बाह्यगोष्टींवर भर देतो. मग एकाला उभा गंध चालत…

  • जाग ललित कथा -आस्वादात्मक समीक्षा – JAAG

    जाग ललित कथा -आस्वादात्मक समीक्षा समकालीन मराठी जैन कथा चळवळ ही जैन समाजातील काही चळवळ्या(active) स्वभावाच्या लोकांनी ललित साहित्यावरील प्रेमापोटी सुरु केलेली चळवळ आहे. म्हणून या चळवळीतील साहित्यिकांची बांधिलकी फक्त साहित्य धर्माशीच आहे… साहित्य धर्माशी बांधिलकी असणारी व्यक्ती मग ती कुठल्याही धर्माची असो, जातीची असो, त्या व्यक्तीच्या लेखनात विशिष्ट धर्मानुयायांची जीवनपद्धती, त्यांचे उपास्य देवदेवता, पूजापद्धती…

  • जन्मोत्सव – JANMOTSAV(आस्वादात्मक समीक्षा)

    समकालीन मराठी जैन कथा चळवळीची विशिष्ट अशी विचारप्रणाली आणि भूमिका यांचे स्वरूप पुनीत या पहिल्याच कथासंग्रहात अगदी ठळकपणे स्पष्ट झाले आहे. पुनीत ते कथानुयोग असा सात संग्रहांचा हा ठेवा मराठी ललित साहित्यात जतन करून ठेवावा असाच आहे. कथा चळवळीतील अनेक ज्येष्ठ लेखक लेखिका, समीक्षक यांचे लेखन, मत मतांतरे, समीक्षात्मक लेखन पाहिल्यास या चळवळीमागील प्रेरणा, उद्दिष्ट…

  • कळस … आस्वादात्मक समीक्षा – KALAS

    पुनीत या समकालीन मराठी जैन कथासंग्रहातील ‘ कळस ‘ या कथेचा काळ पाऊणशे ते शंभर वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ असावा. कथेला त्या वेळच्या महाराष्ट्रातील नांदणी, फलटण, नातेपुते, वाल्हे, दहिगाव या गावांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. श्रेणिक अन्नदाते हे कथालेखक असले तरी त्यांचा मूळ पिंड पत्रकारितेचा आहे. त्यांच्या लेखनाच्या प्रारंभीच्या काळात विविध…