-
श्रावण या ललित कथेचा पुराणकथेच्या आधारे तुलनात्मक अभ्यास – SHRAAVAN
श्रावण या ललित कथेचा पुराणकथेच्या आधारे तुलनात्मक अभ्यास ….. श्री सिद्धचक्र विधान मंडळाच्या संदर्भात आदर्श स्त्री पतिसेवा परायण मैनासुंदरीची एक कथा आपल्या जैन पुराणकथांमध्ये आहे. ही कथा काही जैन तत्वे वाचकांच्या मनावर बिंबवण्यासाठी एक सुंदर कथा आहे असे मानले जाते आणि तशी ती आहेच. ज्या काळात ती रचली गेली त्या काळात त्या काळच्या समाजाला ती…
-
इच्छापत्र( आस्वादात्मक समीक्षा ) – ICHHAAPATRA
इच्छापत्र – संवादातून व्यक्तिचित्रण घडवणारी कथा इच्छापत्र ही ‘व्रती'(समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग ४) या संग्रहातील प्राचार्य डी.डी. मगदूम यांची कथा आहे. या कथेत भीमू ऐनापुरे या व्यक्तीच्या व इतर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यातील १०-१२ वर्षाच्या कालावधीतील घटनापट पाहायला मिळतो. कथा जसजशी पुढे जाते तसतसे भीमू ऐनापुरेच्या व्यक्तिचित्रणात भरत जाणारे रंग पहावयास मिळतात. या कथेचा नायक…
-
भरडलेले अश्रू आस्वादात्मक समीक्षा- BHARADALELE ASHROO
भरडलेले अश्रू ….ललित कथा आस्वादात्मक समीक्षा ललित साहित्य ही एक कला आहे. यासाठीच मराठी जैन ललित साहित्याचा शोध बोध घेताना तो कलात्मक दृष्टीने करून घ्यायला हवा. त्यातल्या जैन या शब्दाचा म्हणजे जैनत्वाचा विचारसुद्धा कलात्मकतेनेच व्हायला हवा. भारतीय परंपरेची मुळे जशी कृषी संस्कृतीत ग्रामोद्योगात आहेत तशीच ती भारतातल्या प्राचीन धर्मसंस्कृतीत देखील आहेत. अलीकडच्या काळात ग्रामीण, दलित,…
-
गझल एक नाट्यगीत – GAZAL EK NATYAGEET
कवी मनाला सौंदर्याचे वेड असते. म्हणजे फक्त एखाद्या वस्तूचे, स्थळाचे, किंवा व्यक्तीचे बाह्यरुपच नाही तर त्यातील अंतरंगाच्या सौंदर्याचा शोध घेण्यासाठीही कवी मन धडपडत असते. निसर्गातले गूढरम्य चमत्कार, घटना यांचा तळागाळापर्यंत जाऊन शोध घेण्यासाठी कवी, कलाकार, शास्त्रज्ञ, संशोधक स्वतःच्या पद्धतीने सतत प्रयत्न करत असतात. कवीच्या सुप्त मनाला सतत अपूर्णातून पूर्णाकडे जाण्याची ओढ असते. सृष्टीतील गूढत्वाचे कवी…
-
प्राक्तन – PRAAKTAN
प्राक्तन दैव नशीब असे शब्द फक्त आपली हतबलता व्यक्त करायला ठीक असतात. खरेतर प्राक्तन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपण स्वतःच भूतकाळात केलेली कर्मे किंवा बांधलेली कर्मेच असतात.ज्याचा भूतकाळ चांगला त्याचा वर्तमानही चांगलाच असतो आणि वर्तमानात जर आपण आपल्याला ओळखून आपल्याला काय हवे आहे हे ओळखून तशीच कर्मे केली तर निश्चितपणे आपला भविष्यकाळही आपल्याला हवा…
-
मंदारचल – MANDAAR CHAL
देवी वाचमुपासते हि वहव: सारं तु सारस्वतं। जानीते नित रामसौ गुरुकुल क्लिष्टो मुरारि: कवि।। अब्धिर्लंघित एव वानर भटै:किंत्वस्य गंभीरतां। आपाताल-निमग्न-पीवरतनुर्जानाति मंदराचल: ।। ~ आचार्य हेमचंद्रसुरि अर्थ – थातूरमातूर पुस्तकी विद्येने आतापर्यंत अनेकांनी वाग्देवीची उपासना केली आहे परंतु सारस्वतसार फक्त गुरुकुल-वासात निवास करून कंटाळलेला मुरारी कवीच जाणतो. वानरसेनेने समुद्र तर ओलांडला परंतु तिला समुद्राची खोली जाणता…
-
हृदयाचा हिय्या – HRUDAYAACHAA HIYYAA
हृदयाचा हिय्या एक विशुद्ध भावकाव्य ….. कवी ग्रेस यांच्या बहुतांश कविता विशुद्ध भावकविताच आहेत. याबाबत म्हणजे विशुद्ध भाव काव्याबाबत कवी ग्रेस स्वतःच असे म्हणतातकी, “विशुद्ध कवितेचा मार्गच तर्काला तिलांजली देऊन तर्काच्या पलीकडून खुणावणाऱ्या नक्षत्र वाटांचा मागोवा घेत असतो. विशुद्ध भावकवितेतील तार्किक सुसंगती लय तत्वाच्या आधारे साधली जात असते. ती जीवशास्त्राच्या सेंद्रिय घटकांप्रमाणे विकसित होत असते,…