-
मधुमास – MADHU MAS
ठेव गुलदस्त्यात गझला खास काही प्राशुनी बघ चिंब भिजले भास काही लेखणीतून शब्द झरती भाव भरले कागदावर उमटता निःश्वास काही पावले डौलात टाके गझल माझी फरपटे ना रचत जाते न्यास काही ओतल्या मकरंद धारा मास तेरा राहिले बाकी तरी मधुमास काही जिंकला विश्वास माझा दैव हरले जीव जगण्या पुरुन उरले श्वास काही
-
कडप्पा – KADAPPAA
प्रीतीने भर भर ओटी वंदन दुहिते शत कोटी संथ वाहते संत मती नितळ वाहती नीर गती कांचन पाचूच्या मखरी पदर भरजरी निळी निरी काष्ठ स्तंभ दो कळस शिरी हिरवळ भूवर मुक्त सरी मुखचंद्रावर तेजस्वी भाव मनोहर ओजस्वी सरळ नासिका कृष्ण कळी काया झळझळ सोनसळी काळ कडप्पा उंबरठा मित्र जिवाचा पाणवठा सजल नेत्र घन भाव पहा…
-
मोहरी – MOHAREE
सुज्ञास सांगणे नलगे कर्मास लाभते फळ गे मोकाट वाहती नळ गे धारेत गाडगे भर गे ज्ञानेश ग्यानबा ज्ञानी देतात प्यायला जल गे गागाल गालगा गागा लघु दोन गुरुसवे चल गे तेलात मोहरी खुलता गालात छानसे खळगे चल देव दर्शना जाऊ भक्तीत जोडण्या कर गे अंतरी झळकते सोने रत्नत्रय हृदयी धर गे
-
सदोदित – SADODIT
नवीन नूतन नवे हवे तर णिच्चम सजग नि लहर सदोदित तू मित्रानवीन काही मिळेल तुजला बोलुन चालुन बहर सदोदित तू मित्रामैत्रिणीस पण मित्राइतुके महत्त्व देण्या निसर्ग शिकवे आत्म्यालानवीन नाती हृदय मंदिरे ठेव स्वच्छ तव शहर सदोदित तू मित्रा
-
बाकी तरिही – BAKI TARIHEE
अर्ध्या हळकुंडाने ते का पिवळे झाले होतेबाकी काही नसले तरिही भरून आले होते भरून अंतर गदगद होता प्याल्यावर प्यालेथरथरत्या बोटांनी गझलाअजून प्याले होते जमिनीवरच्या सरपटणाऱ्या रांगा टाळायालाहवा खेळवुन फुफ्फुस भरता उंच उडाले होते टिम्ब टिम्बच्या रांगोळीवर मुक्त हस्त मम फिरताबरसायाला जलद त्यावरी जलद निघाले होते पुन्हा नवा मी मक्ता गुंफुन नाव सुनेत्रा लिहिताओळीवरती त्याच जुन्या…
-
अष्टाक्षरी – Ashtakshari
अप्रतिम अष्टाक्षरी ..आहे जातिवंत खरी … जात पात पाहतो जो …त्यास धुण्या बाई बरी अप्रतिम अष्टाक्षरी …आहे जातिवंत खरी.. अप्रतिम शब्द धारा …णमोकार मंत्रातली.. जात पाते लखलख ..परजते क्षत्राणी मी अप्रतिम दृष्टी आत्म्यातुला पाहण्यास येते… धुते कषाय मनीचे..तुझ्या चरणी झुकते… अप्रतिम कळा सोसे…नार तुझ्या जन्मासाठी… होते नरवीर नारी.. पुरुषार्थ करणारी… अप्रतिम आत्मपणा…सत्य अहिंसा हा धर्म..…
-
बारस – Baaras
टोक शिखरजी अंतिम पारसजैनत्वाचा पहाड वारस त्यागधर्म हा गुण आत्म्याचाशुक्ल भाद्रपद आहे बारस उपवासाचे करू पारणेप्राश इक्षुरस सोम सुधारस आले आले दिन सौख्याचेगीत मधुर गातो बघ सारस आत्मानंदी चंपा पावानेमि शांतरस आत्म्याचा रस