काटवट कणा खेळत्यात सुना वाकुन वाकुन करे लेक खुणा आली आली सासू उड टणाटणा देगं दे लुगडं उघडुन खणा वटवट सई करतीया जना उडदार काळा नवाच बांधना जावाई म्हणतो गाणं म्हण घना नको नको बापू पवाडाच म्हणा ही नणंद मैना तिला तू वरना शिवारी जोंधळा डोलतोय फणा सुपातला दाणा जात्यात घालना म्हण म्हण ओवी खुंटा…