Tag: ALAK

  • गोठा – GOTHAA

    माईंचा गोठा रिकामा झाला. दुभती म्हैस कुलकर्णीने नेली. भाकड गाय गोशाळेला दिली. माईंनी मोलकर्णीला पगार देऊन, शेणकुटे नाडकर्णींच्या नातवाला होळीसाठी दान दिली. गोठ्यासमोर घोंगडे टाकून माई मग लिहायला बसली. अलक… अती लघुत्तम कथा.

  • अलक रुबाई – ALAK RUBAI

    घरी वावरे रस्त्यावरची वर्दळ जेंव्हा मुकीमुकी परसामध्ये राबत बसते मर्गळ तेंव्हा मुकीमुकी कोरांटीचे कुंपण हिरवे नाजुकसाजुक सान कळ्या आठवते मज सावलीतली कर्दळ केंव्हा मुकीमुकी … गडद निळाई वाकुन बघते हौदामधल्या जळी पेंगुळलेली रातराणी गोकर्णीसम निळी अश्या अवेळी निळ्या घनातुन बरसे जेंव्हा धार जळात उठती थेंबांभवती वलये गोलाकार … अती लघुत्तम कथेस म्हणती अलक बरे अश्या…