-
मस्त मस्त पावसात – MAST MAST PAVASAAT
मस्त मस्त पावसात सख्या फिरू वारियात पांघराया शाल हवी तनू म्हणे गारव्यात नाचू पाय आपटीत वाळूवरी अंगणात रेतीमध्ये तळपाय बुडवूया खोल आत चिमणीचा खोपा बांधू झाड लावू परसात नांद्रूकीच्या फांदीवरी झोके घेऊ झुलूयात बाजगरी ऐसपैस चल गप्पा मारुयात भिजलेल्या वाटांवरी रवापाणी खेळूयात दिसता तो फरूड गे वाघ त्याला म्हणूयात चंदनाच्या पाटावर काचापाणी खेळूयात सये चल…
-
वृक्षवल्ली – VRUKSH- VALLEE
अंगणात आल्या सरी आषाढाच्या वांड पोरी गळा मौक्तिकांच्या माळा पायी घुंगराचा वाळा पाखरांचे थवे गाती ढगांमध्ये उंच जाती जाई जुई चाफा कुंद सुगंधाने मन धुंद हवा जरी गार गार आजाराचा गेला भार फुलापरी मन ताजे गीत प्रीतीचेरे गाजे अता नाही घातपात जगू सारे मस्त शांत मधुमिलनाची घडी उमलली गुलछडी नाही अंगी कसकस जीवनात नऊ रस…