-
खाडाखोडी – KHAADAA KHODEE
ठेव जपूनी मधुघट भरलेले तव अधरी अधरामधल्या बोलांनी भर हृदय घागरी मौनामधल्या भावभावना उसळुन येता अलबत येते गाजत भरती शुद्ध अंतरी गलबत येता मालाने गजबजते बंदर निवडक मालालाच त्यातल्या ठेव आगरी हस्तलिखीते मुद्रण प्रती भर मोजुनीया खतावणीतिल हिशेब दिसण्या खुल्या अंबरी खाडाखोडीवरती सुद्धा लिही खरे रे वळिवाची सर भिजविल पाने तुझी वासरी मात्रावृत्त (२४ मात्रा)
-
रसोई – RASOEE (RASOI)
घरास माझ्या खिडक्या दारे आत वाहते वसंत वारे प्रभात समयी पक्ष्यांसंगे मन म्हणते मज गा रे गा रे बागेमधली फुले पाहुनी काव्य बरसते दरवळणारे अन्न शिजविते रसोईत मी शुद्ध चवीचे आवडणारे अंगणात गप्पांची मैफल सोबतीस मम प्रियजन सारे जिवलग प्रेमाचे शेजारी जणू हासरे भवती तारे घरात तुजला नाही थारा जा दुःखा तू जा रे जा…
-
जिनमंदिर – JIN MANDIR
परिसर सुंदर नयनमनोहर तेथे मनभावन जिनमंदिर रम्य वाट मज तिथे नेतसे खाली भूमी वरती अंबर वाजविता हाताने घंटा मंजुळ घुमतो नाद शुभंकर गर्भगृही स्थापित जिनप्रतिमा दर्शन घेता पावन अंतर प्रसन्न होता मम मनमंदिर वाट घरी मज नेई झरझर गझल मात्रावृत्त (मात्रा १६)
-
बरसो सावन -BARASO SAAVAN
बरसो सावन झूमके ना बैठों तुम रूठके सावन भादो सांवले लगे लहरने घूमके क्या कहती ये मोरनी नाचो सब दुःख भूलके मिलने आये आपसे बहते झरने दूरके बिजुरी बोले पेड़से ना देखो यूँ घूरके मरगट्ठोंकी शान है शेर जयसिंगपूरके सुनो ‘सुनेत्रा’ बात ये ले लो सब गुण फूलके ग़ज़ल मात्रावृत्त (मात्रा १३)
-
गोमटसार – GOMAT SAAR
फांदीवरती पोपट फार हलवे फांदी फोगट नार गोम्मटरायाच्या साठीच गुरुने लिहिले गोमटसार गझल औषधी काढा लाल धरण्या भाळी कोमट धार आम्रतरूच्या घन छायेत मस्त उन्हाळी खोपट गार प्रतिभा साकी ज्या खोलीत नाव तिचे रे सोमट बार धारदार जरी शस्त्र तुझे हात करे तव बोथट वार बळे कुणाच्या न गळा पडे ‘सुनेत्रा’ न ही लोचट हार…
-
अगम्य – AGAMYA
तू नवल घडविले रे जे वाटले अगम्य शत्रुत्त्व राहिले ना झालेय आज धन्य हुलकावणीत गेला अज्ञात भूतकाळ केले गुन्हे गुलाबी ते वाटतात क्षम्य ते आठवू कशाला घडले न जे कधीच आहे भविष्य उज्वल मम् वर्तमान रम्य ज्यांच्यासवे मनाने मी जोडलेय मैत्र मोहांध ना मनुज ते दिलदार सैन्य वन्य मूर्तीतल्या अनामिक या वंदिते जिनास आत्म्यात ईश…
-
नाद अनाहत – NAAD ANAAHAT
क्षमा धारणे मार्दव येते हृदय भिजविते मन वचने कृति यात सरलता शौच प्रकटते आत्ममंदिरी नाद अनाहत मधुर बरसण्या अंतर्यामी शिवरुप सुंदर सत्य झळकते धूप सुगंधी मम् कायेचा संयम धर्मी तपोधुनीने यज्ञी जाळुन काम त्यागते भाव आप पर संसाराची करता वृद्धी त्यास त्यागुनी अकिंचन्य मी खरे जाणते उरता सात्त्विक प्रेम न उरता देहासक्त्ती ब्रह्मचर्य त्या निर्मल…