-
हायहिल्स – HAAYHILS(HIGH HEELS)
हायहिल्स ती घालुन तेव्हां चालायाची टेचातं कधी न गजरा आणि फुलांना माळायाची केसातं ऐकत राही प्रश्न जरी ती उत्तर देई मौनातं नयन झुकवुनी भल्याभल्यांना पाडायाची पेचातं गर्द दुपट्टा सावरीत कधि पायघोळ ती मॅक्सीतं नित्य लपेटुन मोहक साडी भिजे श्रावणी मेघातं रंग सावळा खुलवण्यास ती क्रीम लावुनी गालांसं गुलबक्षीसम अधर मुडपिता वीज सळसळे देहातं भाग न…
-
सापळा – SAAPALAA
कुरूप खुळचट, बदकांमध्ये, हंस खरा आगळा कंस शकूनी, जैसा मामा, किती मूर्ख बावळा शुभ्र घनाला, इतुकी घाई, जाण्याची स्वर्गात धो धो बरसुन, मोक्ष मिळवितो, कृष्ण मेघ सावळा जैसे द्यावे, तैसे मिळते, ठाउक तरी कोणी घेय कोहळा, कोणाकडुनी, देत तुरट आवळा कोकिळ गातो, दडून गाणे, आंब्याच्या पर्णात फांदीवरती बसून डोले, पोपट अन कावळा भक्ष्य मिळविण्या, कीटक…
-
पहिला थांबा – PAHILAA THAAMBAA
तरुणाईचा पहिला थांबा वय चवदा की सोळागं बाराचा की दहा ग्रामचा खरा कोणता तोळागं तारेवरती अधांतरी तू चालतेस बघ तोऱ्यातं पुरे ताणणे तुटेन आता प्राण जाहला गोळागं कटिवर घागर घेउन जेंव्हा पाय टाकिशी पाण्यातं मस्त झुळझुळे रेशिम-हिरवा नऊवारिचा घोळागं किती खिळखिळे करशिल मजला चूक चुकचुके वेडातं नाव शोभते कुठलेही तिज खिळा चुका स्क्रू मोळागं नको…
-
पाउलवाटा – PAAULVAATAA
कुणी कुणावर प्रयोग करिती स्वार्थ साधण्यासाठी स्वार्थातच परमार्थ पाहती टोक गाठण्यासाठी प्रात्यक्षिक हे फक्त असावे जीवाला जपण्या बरे न पिळणे इतुके कोणा भोग भोगण्यासाठी शब्द आंधळे पाडत जाता चरे काळजाला संयम अपुला येतो कामी लेप लावण्यासाठी पाउलवाटा झाल्या दर्शक घाट चढायाला मार्ग बनविती स्पर्धक सारे फक्त धावण्यासाठी बाईपण मम मौन जाहले कुचकट शेऱ्यांनी फक्त एकदा…
-
एकमेका सावरू – EKAMEKAA SAAVAROO
बोचरी थंडी हिवाळी शीळ घाली पाखरू वारियाने वस्त्र उडता स्वप्न माझे पांघरू काचता दावे गळ्याला उखडुनी खुंटी तिची माळरानी धाव घेते धुंद अवखळ वासरू दाटते आभाळ जेंव्हा मौन घेते ही धरा वीज येता भेट घ्याया खडक लागे पाझरू पाहण्या उत्सुक असे मी मुग्धतेतिल गोडवा पावसाळी वादळाने तू नकोना बावरू फेक ती काठी ‘सुनेत्रा’ गावयाला मोकळे…
-
ऐसा लौकिक – AISAA LOUKIK
स्त्री रत्नाचा ऐसा लौकिक कनक कोंदणी जैसा मौक्तिक लौकिक मौक्तिक असेल भौतिक बाल मनाला त्याचे कौतिक हृदय मंदिरी देव कैक पण शुद्धात्म्याचा थाट अलौकिक अंतरात जरी मूढ गूढता मृदू कुणाची वचने मौखिक विशुद्ध भक्ती ज्ञान देतसे अनुभूतीचा प्रत्यय मौलिक मात्रावृत्त(८+८ =१६ मात्रा)
-
सुनेत्रा – SUNETRAA
This ghazal is written in akshargan vrutt. vrutt is LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA. तुला मी मला तू अता आवडावे तुझे नाव माझ्या पुढे मी लिहावे जुनी प्रेमपत्रे गुलाबी मनाची वहीतून फोटो बुके पाठवावे पुराणातल्या त्या कथा वाङ्मयाचे दुधी वांगियासम भरित मी करावे जिला ना कळाली अहिंसा फुलांची…