-
तापता गोठता – TAAPATAA GOTHATAA
तापता गोठता अंबरी पीर हे मेघमालेतुनी बरसले नीर हे वारियाने उडे पल्लवी तीक्ष्ण ही माधवी वल्लरी उधळिते तीर हे हारणे ना अता ध्यास हा लागता जिंकण्या त्यागिती मीपणा वीर हे पूर्ण तो चंद्रमा हासता विहरता सांडते भूवरी चांदणी क्षीर हे रक्षिण्या मायभू बांधवा आपुल्या सोडुनी शत्रुता ठाकले मीर हे चूक मम व्हावया खूप घाई नडे…
-
माय माझी – MAAY MAAZEE
माय माझी अता रे कुठे राहते कोण सांगेल मज नव तिचे नाव ते स्वप्न मी पाहते झोपता जागता बालिका होउनी गोड ती हासते नाचते खेळते ती परी होउनी अंगडे टोपडे घालुनी झोपते तिजसवे बोलण्या गीत मी लिहितसे मायबापा तिच्या पत्र मी धाडते म्हणतसे कोण मज ही पुरी नाटके नाटकी माणसे मी अशी टाळते Ghazal in…
-
रंगलेल्या नभी – RANGLELYAA NABHEE
रंगलेल्या नभी सूर्य नारायणा अर्घ्य देण्या तुला ताठ माझा कणा पेल हाती ध्वजा लाव कळसावरी शुद्ध आहे तुझी भावना धारणा साठलेले जळी प्रेम गंधाळले उघड आता खऱ्या अंतरीच्या खणा सर्प मित्रांसवे केतकीच्या बनी नाग चिंतामणी डोलवीती फणा वाहिले तू पुरे काव्य हृदयातले उपट डोक्यातल्या माजलेल्या तणा पुस्तके वाचुनी लेक झाली गुणी लोकगीते तिची रेशमी झोळणा…
-
स्रग्विणी वृत्त जाणायचे – STRGVINEE VRUTT JAANAAYACHE
स्रग्विणी वृत्त जाणायचे आज तू गालगा चारदा गायचे आज तू गालगा गालगा गालगा गालगा हे लगावून वाचायचे आज तू गालगागा लगा गाल गागालगा वेगळे सूर ही द्यायचे आज तू गाल गागालगा गालगागा लगा यातही कोंबुनी घ्यायचे आज तू मी ‘सुनेत्रा’ मला ना यशाची नशा चिंब प्रेमामधे न्हायचे आज तू स्त्रग्विणी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः गालगा गालगा गालगा…
-
आज माझ्यासवे – AAJ MAAZYAASAVE
आज माझ्यासवे गझल होशील तू कृष्ण मेघांपरी सजल होशील तू वेड मोठे जरी सहज पेलेन मी साथ देण्या मला तरल होशील तू संगतीने तुझ्या काव्य आले घरी शब्द-चित्रातले नवल होशील तू वाट पाण्यातली सुगम होईल रे देठ होईन मी कमल होशील तू प्रेम सौख्यामधे चिंब भिजणार मी जाळण्या वासना अनल होशील तू स्त्रग्विणी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः…
-
लावला सापळा – LAAVALAA SAAPALHAA
लावला सापळा आज जो तो खरा घातला मी तुला साज जो तो खरा पांढरी कार अन लाल बत्ती वरी खास माझा असा बाज जो तो खरा पकडले कैक मी फोडुनी बांगड्या ओळखे फक्त आवाज जो तो खरा काय सांगू कुणाला करांच्या कळा वाजवी मस्त पखवाज जो तो खरा भंगलेले जरी शिल्प जुळते पुन्हा जाणतो यातले…
-
हरवले नयन बघ श्यामले – HARAVALE NAYAN BAGH SHYAAMALE
हरवले नयन बघ श्यामले मौन हे अधर बघ श्यामले पर्ण हे लाल दो जुळवुनी लावले कुलुप बघ श्यामले पाकळ्या उमलण्या दोन या राहिशी अचल बघ श्यामले चेहरा लाभला तुज खरा देह तव सजल बघ श्यामले तुडविती माणसे ही भुई नेत्र तव सजल बघ श्यामले तू क्षमा धारिणी माय गे स्पर्शिते चरण बघ श्यामले तू धरा…