-
पाहुण्या – PAHUNYA
कुणी फुंकले कान कुणाचे कोणासाठी .. कुणी फुंकले रान कुणाचे कोणासाठी… कुणी फुंकले भान कुणाचे कोणासाठी.. कुणी फुंकले प्राण कुणाचे कोणासाठी… कुणी फुंकले पान कुणाचे कोणासाठी.. कुणी फुंकले बाव कुणाचे कोणासाठी … फुका लाटुनी गोल चढावे अव्वासव्वा .. कुणी फुंकले दान कुणाचे कोणासाठी … असे कोणते कर्म कराया देशासाठी.. कुणी फुंकले वाण कुणाचे कोणासाठी ……
-
कोण कितीजण – KON KITEEJAN
मुक्तक … कोण कोण पडत्यात कळले बाई कोण रडत्यात कळले बाई मी कश्याला रडावे सांगा कोण सडत्यात कळले बाई गझल .. कितीजण कोण पळाले कळले कळले कोण कसाई टळले कळले गा गा ल ल गा म्हणत राहता कोण बरे हळहळळे कळले रंगवलेल्या वाड्यामध्ये कोण कितीजण चळले कळले बात कशाला सांगू कसली कोण जुगारी ढळले कळले…
-
प्रमाणे – PRAMANE
खरे ते मरुन जन्माला पुन्हा येता ..झरे येथे खरे ते सत्य रेखावे जरी पाडे .. चरे येथे कधी भूकंप कोरोना निसर्गाच्या वळण वाटा खरे ते धर उमेदीने वसायाला घरे येथे फुलांचे दूत वारे ! वादळे अन कीड भुंगे ना .. खरे ते ! खोल गाभारे सुगंधाने भरे येथे … नको बाजार गप्पा वेळकाढू हृदय सोलूया…
-
लळीत – LALHIT
शीक वाटण्या मुला चुलीत तू करायला शीक भेद ना मुलामुलीत तू करायला शीक दंभ ढोंग सोंग चीत तू करायला शीक गझलचे सुलभ सुनीत तू करायला ..हुसने मतला अक्षरांस जोडुनी कवीच शब्द बनवितो शीक शब्द वळत गोल गीत तू करायला आग कोंडुनी सदैव नेत्र लाल लाल हे शीक उष्ण भावनांस शीत तू करायला नेक काम फक्त…
-
विशुद्धी – VISHUDDHI
संकल्पाची जात असावी ठाम निश्चयी संकल्पाला वात असावी राम निश्चयी पुढच्या वर्षी करूच पुढचे आज आजचे संकल्पासह बात असावी दाम निश्चयी व्यवहाराने जगती जगता जीव जपाया संकल्पातच मात असावी साम निश्चयी भरून प्याला जसा सांडतो पुण्य तसे हे संकल्पा तुज कात असावी घाम निश्चयी कर्मनिर्जरा सहज सुनेत्रा अशी विशुद्धी संकल्पावर पात असावी नाम निश्चयी