-
बिजली – BIJALEE
थंडावली घनात बिजली कडाडणारी थंडावली रणात बिजली कडाडणारी रंगून रंगवीत भिजली स्वरात राई थंडावली वनात बिजली कडाडणारी गागालगा लगाल गागालगा लगागा मात्रांसवे गणात बिजली कडाडणारी मेघांत गोठवून जलधार अंतरीची नाचे तनामनात बिजली कडाडणारी कातावल्या शरास धरता करी सुनेत्रा अंगी कणाकणात बिजली कडाडणारी
-
खाक्या – KHAKYAA
मौन काव्या कळे सख्य माझे तुझे मौन अधरी भले सख्य माझे तुझे नित्य सौख्यात मी रोज तैसाच तू मौन उघडे दळे सख्य माझे तुझे दावता पोलिसी कडक खाक्या तुझा मौन किंचित हले सख्य माझे तुझे मस्त माझ्यात मी मूक होते सखे मौन सखये तळे सख्य माझे तुझे शोध कोठे सखी गुप्त झाल्या सख्या मौन मुक्ताफळे…
-
कारण – KAARAN
कारण चपखल रुतते आहे कारण त्याचे सलते आहे शब्द चोरटे गाली हसता कारण नकळत फिरते आहे चोरांच्या उलट्या बोंबांनी कारण तिळतिळ तुटते आहे फुलवायल वा असो पैठणी कारण वरवर चढते आहे पुफ्फ सुगंधी दरवळणारे कारण सौरभ झरते आहे मधमाशीसम बछड्यांसाठी कारण कारण लढते आहे घुम्या वेदना घुमत राहती कारण पुरुनी उरते आहे भरून पिंडी आनंदाश्रू…