-
लोचना – LOCHANA(EYES)
पर्ण दोन झळकतात जोडवी किनार दो चरण कृष्ण उमटतात पावले जलात दो मूर्त स्वरुप भावभोर सावळी जमीन ही धरण इंद्र बांधतोय जांभळ्या सुरांवरी गाल गाल गालगाल गालगा लगाल गा गालगाल गालगाल गालगाल गालगा हीच रे लगावली किती सुरेल भावना आवडेल का तुला नवीन गझल लोचना साधनेत पूजनात दंगलेत जीव हे प्राकृतीक मंदिरात शिल्प ना घडीव…
-
गूगल अस्सल शोधक इंजिन – GOOGLE GENUINE SEARCH ENGINE
जाति : हरिभगिनी आंतरजाली बहरुन आली सुरभित अक्षरसृष्टी रखाडीतल्या ठिणग्या फुलवी निसर्गसुंदर सृष्टी नाकारे पंथाचा चष्मा गटातटाचा नारा तिला डांबण्या ब्रह्मांडी या नाही कुठला कारा पटते ते ती लिहिणारी नोकर ना पण सरकारी अढळ ध्रुव पण दरबारी नकाच लागू तिचिया नादी असाल जर का भ्रष्टी रखाडीतल्या ठिणग्या फुलवी निसर्गसुंदर सृष्टी अंधरुढींना डोक्यामध्ये कधी न देते…
-
स्वर्ग – SWARG
-
धार लावली – DHAAR LAAVALEE
धार लावली पेन्सिल तासुन पात्याने ब्लेडच्या टोकयंत्र वा गिरमिट फेकुन पात्याने ब्लेडच्या पेन्सिलीतले टोक शिश्याचे तीक्ष्ण जाहल्यावरी तिला पकडुनी लिहिली कविता शुभ्र कागदावरी लिहिता लिहिता अक्षर अक्षर सजीव झाले असे बकुळ फुलांसम सुगंध त्यांचा हृदयी माझ्या वसे बकुळ तळीच्या मातीमध्ये बकुळ शिम्पते फुले परिमल त्यांचा मातीमधुनी वाऱ्यावरती झुले काव्यफुलातिल पराग कोमल रुजूदेत मन्मनी काव्य फुलूदे…
-
केंद्र – KENDRA
केंद्र कोणते परीघ पुसतो नवल वाटते त्रिज्येला ठोकुन खुंटी केंद्रावर ती मार्ग आखते संध्येला संधीकाली डोंगरमाथी रंग केशरी उधळाया सविता उतरे जळात अलगद सोनेरी तनु बुडवाया तरंग उठती निळ्या जळावर वर्तुळ विस्तारत जाते व्यासही मोठा मोठा बनतो काठाशी जोडे नाते स्पर्शायाला मृदा काठची लहरींसंगे धावाया वारा येतो शीळ घालतो जलबिंदूंना चुंबाया जलदेवी रात्रीला येते मुग्ध…
-
माग – MAAG
स्वप्न पाहिले होते तेंव्हा फक्त तुझेकी त्यांचेही या प्रश्नांचा माग काढण्या अजूनही बघ गाते मी भेटी अपुल्या त्या तेंव्हाच्या दर्पणातल्या प्रीतीच्या क्षण अनुभवण्या हुरहुरणारे मागे मागे जाते मी शांत तडागाच्या काठावर बसुन पाहता प्रतिबिम्बा बिंबामधली अनंत रूपे तुझीच बघुनी खुलते मी जे जे माझे ते सर्वांचे वेगवेगळे ना काही सुटता गुंता उजळुन जाते तुझे नि…
-
कातरवेळी – KAATARVELEE
अचूक कैश्या घटिका मोजू अंधुक धूसर कातरवेळी दिवा लाविता ज्योतीवरती पतंग जळती कातरवेळी बोलायाचे ऐकायाचे बरेच जे जे राहुन गेले आठवुनी तुज तेच बोलते तुला ऐकते कातरवेळी जिथे जिथे मी तुला भेटले नजरेमधले गूढ वाचले अश्या जळिस्थळी शांत तरुतळी फिरून येते कातरवेळी मौनामधले प्रश्न बोलके अधरावरती गोळा होता गाते भजने स्तोत्र आरत्या देवापुढती कातरवेळी हृदयावरती…