-
धिंगाणा – DHINGAANAA (razzle)
पुन्हा पुन्हा यावी दारी पावसाची सर चिंब चिंब व्हावे पुन्हा मन सैरभैर अंगणात चिमण्यांनी धिंगाणा घालावा आई आई म्हणताना जीव वेडा व्हावा येशीलका आई घरी होउनीया परी दादांसवे गप्पागोष्टी करावया घरी रांधेन मी तुझ्यासाठी मऊ भात खीर दादांसाठी लढावया होईन मी वीर आई दादा कुठे आता असाल जगात जिथे आहे तिथे तुम्ही असाल सुखात…
-
अजूनही ती – AJOONAHEE TEE (“she still”)
अजूनही ती.. मजला जपते….. अडखळता मी उंबरठ्याशी… हात देउनी मज सावरते अजूनही ती मजला जपते गाठी घालित आणिक आवळीत बसते जेव्हा शल्य मनातिल हळूच शिरते बोटांमध्ये उकलुन गाठी मन उलगडते अजूनही ती मजला जपते… तिचे सजवणे घास भरवणे आठवताना मन झरझरता नाजुक साजुक बोली बनते अश्रुंसंगे बोलत बसते पापण काठी बांध घालते अजूनही ती मजला…