-
भवंदाज – BHAVANDAJ
दर्पणी माझिया मौन अंदाज तू लक्ष्य भेदून जाई तिरंदाज तू स्वच्छ ऐन्यामधे बिंब तव श्रीमती आरसा नीर वारा घरंदाज तू शांतता चारुता चंद्रमा अंबरी त्याग मिथ्यात्व अन घे भवंदाज तू डाव दांडू चिनी भारती इंग्रजी उडव तू झेल तू हो गुलंदाज तू मार चौकार रे सा लिही गावया ठोक छक्का सुनेत्रा फलंदाज तू
-
सोनी – SONEE
कळ्या फुले गुलाबाची आणि पाने ओवलेली रंगसंगती सुरेख हृदयात साकारली पूर्ण चित्र पापणीत झरझरे वासरीत हवे हवे ते मिळाले जिनदर्शनाने तृप्त लिहीत मी जाता सुचे अर्थ लागे अर्थातून अर्थासाठी अर्थ नवा जगण्याला जीवातून लिही सुनेत्रा सोनु तू सोनी जसे नाव छान मैत्र मैत्री टिकू द्यावी बालपणी गाव एक
-
शिशुपण – SHISHUPAN
पुराण इतिहास भूगोल वाचत लिहावं पुस्तक असं वाटतं, कुणी नाही वाचलं तरी परत परत लिहावं वाटतं. दशपदीतल्या दहा ओळींचे कशाला मोजावे काने मात्रे, लय पकडुन अक्षरांवर ओढावे खुशाल सहज फराटे. काटे फराटे बरे असतात सलामत ठेवतात गुपित जपून, सरसर झाडावर झटकन पटकन जाते जशी खार चढून, अजुन अजून अजून म्हणतं बाळ चॉकलेटचा हट्ट धरून, समजावून…
-
समाधी – SAMADHI
सर्व लक्ष्म्या पावल्यावर पावते मन मोक्ष्मलक्ष्मी जीवनाचे रंग सारे दावते मन मोक्ष्मलक्ष्मी लाभण्या संसार शांती लेकरांना हिमनदीने घेतली जेथे समाधी बाव ते मन मोक्षलक्ष्मी सांजसमयी गोधुलीला जीव ध्यानी लाल गोळा अंतरीच्या दीपज्योती लावते मन मोक्षलक्ष्मी चेहऱ्यावर सरलतेचे भाव तपुनी वर्तमानी लेक नाती सून सासू राव ते मन मोक्षलक्ष्मी मिळविण्या मध पेटवीता भडकुनी मोहोळ उठते भृंग…
-
टाच – TAACH
भरुन शेण मी सुधारलो ना बाप सायबा कोरोना की म्हणू करोना बाप सायबा डबल डबल म्या टीप मारुनी टाच लावली कसा फाटला चुकार कोना बाप सायबा शेतकरी मन उदासवाणे कधीच नसते म्हणत जाय ते होला होना बाप सायबा भांप बाष्प की वाफ म्हणावे गरम हवेला प्रश्न जिरवतो विचारतो ना बाप सायबा ग़ज़ल गुरू तो पढवून…
-
शिदोरी – SHIDOREE
राऊळाची वाट सुंदर नि सोपी कैवल्य चांदणे खिरे घनातून घाटातून वाट चढत जाऊया डोंगरी निर्झर खळाळे बागडे पुण्याची शिदोरी सोडून वाटून खाऊ घास घास आनंदाने ओंजळीने पाणी पिऊन तहान भागेल खरेच चला पुढे जाऊ राऊळ दिसले हात जोडले मी कळस झळाळे सूर्य किरणात चंद्रकोर बीज गगनात आली अंतरी शुद्धात्मा जिनदेव माझा राऊळी गाभारा घंटेचा निनाद…
-
निहार – NIHAR
शिशिर ऋतूतील पहाट भासे हवा मुखातील निहार भासे चार चरण यूत चारोळी वा स्वर काफियातिल मुक्तक भासे डावी असूदे अथवा उजवी सात बाराचे शिवार भासे कृष्णा माझी दुहिता मंडीत मूर्त मनातील सुकण्ण भासे नूरजहां मी अनुजा सुनेत्रा तिप्प तनूतील नहार भासे