Tag: Marathi Geet

  • परिमल – PARIMAL

    परिमल उधळित पुष्प पाकळ्या उमलत जाती रंग बरसती धुंद होउनी कोमल पाती कोमल पाती मुग्ध कळ्यांशी माझे नाते गरगर फिरतो हात आणखी दगडी जाते जात्यामधुनी पीठ झरझरे ऐकत किलबिल वाऱ्यासंगे गात येतसे झुळझुळ परिमल

  • प्याल्यामध्ये पेय भरावे – PYAALYAA MADHYE PEY BHARAVE

    प्याल्यामध्ये पेय भरावे भरून गाण्या हात पाय अन ध्येय असावे तरून जाण्या जाण्यासाठी दूरदूरवर पैल तटावर भटकत असतो गात गुराखी ताल सुरांवर बासरीतुनी गीत उतरते डोळ्यांमध्ये थेंबे थेंबे प्रेम बरसते प्याल्यामध्ये

  • झुलते सुंदर वेल – ZULATE SUNDAR VEL

    झुलते सुंदर वेल मांडव सोसे फुलभार कुंपण ओले केतकी परसदार अन माड परसदार अन माड नाहतो जलधारांनी बहरुन गेले रान गातसे निर्झर गाणी झरा वाहतो मुक्त मनाने पाणी उडते चिंब भिजोनी एक सान तृणबाला झुलते

  • गिरवुन गिरवुन – GIRAVUN GIRAVUN

    गिरवुन गिरवुन अक्षरे दे शब्दांना धार कलम करी तू घेउनी कर भवसागर पार कर भवसागर पार बांधुनी साकव मोठा उत्तम आर्जव ठेव अंतरी लाघव ओठा अंतर आतम तार जुळाया गाउन फुलवुन सुंदर वचने कोर त्यावरी गिरवुन गिरवुन  

  • कोण पऱ्यांना – KON PARYAANNAA

    कोण पऱ्यांना अमुच्या सुंदर आवडती सुकुमार… शोधुन काढू पिंजुन विश्वा शूर असे सरदार… मधुबालेसम नाजुक कन्या कुणी न स्पर्धक त्यांच्या पुण्या गुढी उभारुन त्या सत्याची उलथतील सरकार… ऐनकातुनी रोखुन बघती कपट जाळती मधुर हासती शोभुन दिसती तळपुन उठती जणू करी तलवार… अहंपणाचा अर्थ न ‘मी’ पण तू तू तू तू नसते शिकवण उपजत प्रीती तिरकस…

  • आली मंगल घटिका खरी – AALEE MANGAL GHATIKAA KHAREE

    दवबिंदूंनी घट भरला अन थरथरली बासरी…आली मंगल घटिका खरी … वेदीवरती प्रभू तीर्थंकर कुंजवनी पक्ष्यांचे सुस्वर भारद्वाज नि कोकिळ गाती झुळूक फिरे नाचरी… आली मंगल घटिका खरी… लता माधवी मुग्ध वल्लरी उभ्या घेउनी पुष्प-आरती निसर्ग ओते या पृथ्वीवर सौख्याच्या घागरी… आली मंगल घटिका खरी … पुनव चांदणे ऋद्धी सिद्धी भिजे चांदणी कुलीन बुद्धी वीज चमकते…

  • वरण भात जरि – VARAN BHAAT JARI

    वरण भात जरि त्यास आवडे ताक कण्या तिज आवडती जात्यावर ती ज्वारी भरडे ताक कण्या तिज आवडती तोलुन मापुन तो खातो पण हवे तेवढे खाते ती बाथ घेतसे टबामधे तो शुभ्र प्रपाती न्हाते ती भाताने बघ वजन वाढते नकोच खाऊ म्हणते ती जिमला जावे तो म्हणतो तर फिरण्या जाऊ म्हणते ती तो म्हणतो तिज प्रीत…