-
निर्भेळ भेळ – NIRBHEL BHEL (PURE BHEL PURI)
निर्भेळ भेळ माझी आहे गझल गुणांची दिलदार खेळ माझी आहे गझल गुणांची ताशा गिटार बाजा वेणू गुणी तुतारी संगीत मेळ माझी आहे गझल गुणांची रानात शांत समयी ओटी भरून आई उजवेल केळ माझी आहे गझल गुणांची रत्नेच जी अपत्ये त्यांना सुखे रहाया साधेल वेळ माझी आहे गझल गुणांची परिणाम भाव शुद्धी हेतूत आत्मगोष्टी म्हणतेय हेळ…
-
त्रस्त – TRAST (IRRITATED)
तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची मतला माझा कुणा कधी ना पटतो दोस्ता मतला माझा माझ्यासाठी असतो दोस्ता आवडलेल्या ओळीवरती तरही लिहिते तुझा त्यातुनी विचार मजला कळतो दोस्ता असे लिहावे तसे लिहावे डोस प्राशुनी कधी न आत्मा त्रस्त तरीही विटतो दोस्ता शब्दांवर का असे कुणाची सांग मालकी नवोदितांना शब्दचोर तो म्हणतो…
-
अहाहा! – AHAAHAA! (OHO HO!)
तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी निशिकांत देशपांडे यांची मनमोकळे करावे कोणापुढे कळेना सारेच ऐकवीती श्रोता कुठे दिसेना कुंडीतल्या तरूवर लिहिल्या उदंड गझला जाऊ कुठे विकाया बाजारही भरेना वेलीवरी फुलांच्या गर्दीत मूक पाने जो तो म्हणे अहाहा ! कोणी फुले खुडेना हे काफिये गझलचे असुदेत तंग ढगळे टाळूनिया तयांना लिहिणे मला जमेना पंचेंद्रिये झरोके करण्यास…
-
भोला – BHOLAA (NAIVE)
तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची कुठे मनाला खोलायाची सोयच नाही आता म्हणेन कोणा भोला याची सोयच नाही आता इतुके त्यांनी जीव कोलले मनोरंजनासाठी विटीस सुद्धा कोलायाची सोयच नाही आता नंदीबैलासमान त्यांनी डोलविल्यावर माना सुरांवरीही डोलायाची सोयच नाही आता मीच कातडे सोलत जाता माझ्या कायेवरले पक्व केळही सोलायाची सोयच नाही आता…
-
कळस … आस्वादात्मक समीक्षा – KALAS (APPRECIATIVE CRITICISM)
पुनीत या समकालीन मराठी जैन कथासंग्रहातील ‘ कळस ‘ या कथेचा काळ पाऊणशे ते शंभर वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ असावा. कथेला त्या वेळच्या महाराष्ट्रातील नांदणी, फलटण, नातेपुते, वाल्हे, दहिगाव या गावांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. श्रेणिक अन्नदाते हे कथालेखक असले तरी त्यांचा मूळ पिंड पत्रकारितेचा आहे. त्यांच्या लेखनाच्या प्रारंभीच्या काळात विविध…
-
श्रावण या ललित कथेचा पुराणकथेच्या आधारे तुलनात्मक अभ्यास – SHRAAVAN (APPRECIATIVE CRITICISM)
श्रावण या ललित कथेचा पुराणकथेच्या आधारे तुलनात्मक अभ्यास ….. श्री सिद्धचक्र विधान मंडळाच्या संदर्भात आदर्श स्त्री पतिसेवा परायण मैनासुंदरीची एक कथा आपल्या जैन पुराणकथांमध्ये आहे. ही कथा काही जैन तत्वे वाचकांच्या मनावर बिंबवण्यासाठी एक सुंदर कथा आहे असे मानले जाते आणि तशी ती आहेच. ज्या काळात ती रचली गेली त्या काळात त्या काळच्या समाजाला ती…
-
इच्छापत्र( आस्वादात्मक समीक्षा ) – ICHHAAPATRA (APPRECIATIVE CRITICISM)
इच्छापत्र – संवादातून व्यक्तिचित्रण घडवणारी कथा इच्छापत्र ही ‘व्रती'(समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग ४) या संग्रहातील प्राचार्य डी.डी. मगदूम यांची कथा आहे. या कथेत भीमू ऐनापुरे या व्यक्तीच्या व इतर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यातील १०-१२ वर्षाच्या कालावधीतील घटनापट पाहायला मिळतो. कथा जसजशी पुढे जाते तसतसे भीमू ऐनापुरेच्या व्यक्तिचित्रणात भरत जाणारे रंग पहावयास मिळतात. या कथेचा नायक…