Tag: MARATHI LITERATURE

  • क्या बात – AMAZING

    वाहवा क्या बात ही जणु दुधारी पात ही मातृधर्मा  जागते नागिणीची जात ही लखलखे जणु आत्मजा टाकुनी बघ कात ही ही न मिथ्या देवता समय समई वात ही मी “सुनेत्रा” टपटपे गझल लिहिते गात ही  

  • सुमक्ता – GOOD MONOPOLY

    अरेव्वा ! अरेवा ! किती सांग मात्रा .. स्वराघात धरुनी सती सांग मात्रा …. अरेवा ! अरेवा ! ! असे ते म्हणाले .. तुझ्या तू मतीने रती सांग मात्रा …. अरेवा म्हणाले जरी लीलया ते … अरेवातल्या मज यती सांग मात्रा …. स्वराघात रे वर न झाला जरी रे … अरेवातल्या रेवती सांग मात्रा ……

  • पवन – AIR

    पात्र निर्झरी झुकून लागले भरायला लाल लाल लाल लाल लाल लाल लालला पर्ण पाकळ्या सचैल चिंब वल्लरी झरे तापल्या झळांत गात मुकुल बहर टिकवला कोणती लगावलीय वृत्त नाम कोणते मी न शोध घेत बीत काव्य धर्म भावला अंतरातल्या जळी समुद्र गुप्त जाहला शीळ घालतो न पवन कुंदनात मढवला कर्म धर्म ज्ञान ध्यान गुरुकुलात साधना सावलीत…

  • जादुई रत्नत्रय – MAGICAL RATNTRAY

    आपण जेंव्हा जन्मतो तेंव्हा आपल्या आत एका परिपूर्ण सर्वांगसुंदर आत्म्याची प्रतिमा असते. त्या प्रतिमेनुसारच आपण घडत वाढत जातो. हि प्रतिमाच आपली सच्ची जन्मकुंडली असते. आपली कुंडली आपण स्वतःच मांडू शकतो. जाणू शकतो. आपल्याला हवी तशी बदलूही शकतो. त्यासाठी इच्छाशक्ती बुलंद असावी लागते.हाच तर आपला प्राण असतो. दुसरा कोणीही आपली सच्ची जन्मकुंडली जाणू शकत नाही. लिहू…

  • वाकड – BENT

    विटी कोलली वाकड झाली झोप उडाली झापड झाली लाट लाटली इतुकी पातळ तळून पोळी पापड झाली बारा वाजुन गेल्यावरती कशी आरती काकड झाली कणकेमधुनी मोहन गायब शिळी चपाती वातड झाली खच्चुन भरला मिथ्य मसाला कथा मूळची भाकड झाली जगी मिरविण्या घेतलीस जी जबाबदारी कावड झाली जिन धर्माची ध्वजा पेलण्या आज सुनेत्रा धाकड झाली

  • बिडी – THIN HANDMADE CIGARETTE

    पावलात दो तिडी असूदे वा दुर्वांची जुडी असूदे धूर सोडण्या मजेमजेने अधरावरती बिडी असुदे कणिक तिंबण्या साधन म्हणुनी करी जाडजुड छडी असूदे हळद उतरण्या अंध रुढींची दोन नयांची शिडी असूदे मुक्तक झाले पूर्ण तरी पण तिसऱ्या शेरी उडी असूदे शरी कुडीतच जीव जरी रे ऊर्ध्व गतीची छडी असूदे रत्नत्रय अंतरी सुनेत्रा सिद्ध गझल पोतडी असूदे

  • तुंबळ- FIERCE

    मंगल मंगळ मंगळवार मंदिर आगम कंदिल वार चंचल उपवन जंगल रान मंथर अंगण अंचल वार कुंदन कंकण किणकिण नाद मंद पवन घन मंजुळ वार झुंबर अंबर लखलख वीज मंचक झुलता कुंडल वार पावन बेला गोरज सांज मंत्र णमो जिन मंगल वार वृत्ती वृत्तातील प्रकार मंदाक्रांता तुंबळ वार शुक्र उगवला वारी आज मंडप मांडव मंडळ वार