Tag: MARATHI LITERATURE

  • चंदा – Donation

    माधव केशव वा गोविंदा नगर पुरीचा तो तर बंदा स्टार्टर लावायाच्या आधी सुरू जाहला अवैध धंदा वाटत वाटत डाळ चण्याची तुटले बंधन चारुन कुंदा बोल लावला खोटा बाबा गळी पडूनी झाला फंदा करून उष्टा उरला सुरला बाटलीत ती भरते चुंदा उद्योगाची वाट लावुनी कोठडीत उद्योगी मंदा भूमातेचे स्वत्त्व जपाया चंद्र देतसे अभय नि चंदा गझल…

  • रोहिणी – Nakshtra, Lunar mansion

    कवितेची बनवाया छत्री आले सारे तारे कवितेची फिरवाया छत्री आले सारे तारे कल्पनेतली पद्ममोहिनी विद्येला भिजवाया कवितेची उडवाया छत्री आले सारे तारे आषाढातिल मेघगर्जना ऐकुन उडता इरले कवितेची फुलवाया छत्री आले सारे तारे रंगबिरंगी कळ्या जोडुनी मजबुत दांड्यावरती कवितेची सजवाया छत्री आले सारे तारे मस्त रोहिणी निळ्या अंबरी इंद्रधनुष्यी बसता कवितेची झुलवाया छत्री आले सारे…

  • भरीव – Substantial

    जीवन सुंदर अतीव आहे मनात मंदिर वसलेले जीवन सुंदर सजीव आहे मनात मंदिर वसलेले पहाट वारा वाहत नाचे फुले उमलली बनी वनी जीवन सुंदर घडीव आहे मनात मंदिर वसलेले भीती चिंता पोकळ साऱ्या तमात रात्री विरलेल्या जीवन सुंदर भरीव आहे मनात मंदिर वसलेले कोमल प्रमुदित भावफुलांचे सुगंध भरता मम हृदयी जीवन सुंदर वळीव आहे मनात…

  • सत्याचा प्रयोग – Experiment of truth

    काळ्या काळया विठोबाला दंडवत माझा काळया काळया उजेडाला गंडवत माझा नमस्कार हातांची दो घडी घालुनीया काळ्या काळया रखुमाईस बंडवत माझा मोक्ष मिळायाला केला सत्याचा प्रयोग काळ्या काळ्या कायेवरी भंडवत माझा जीव मौनी अभय होण्या भव्य राजवाडा काळ्या काळ्या शासकांना फंडवत माझा पाहतेय श्रद्धेने मी मूर्त रूप आत्मा काळया काळया पाषाणात खंडवत माझा गझल मात्रावृत्त (मात्रा…

  • आर्या – Name of the poetic meter

    हंसगती शुभ आर्या सिंहगती सैनिकी सबल आर्या गजगामिनी सुंदरी सर्पिणी जणू कुरळ आर्या निज आत्म्यात रमाया अक्षरी लीन ब्राम्हीसम आर्या वाग्देवीने अंकित नागीण कृष्ण सरळ आर्या अष्टद्रव्य अर्पिण्यास चालली मानिनी श्यामल आर्या जिनबिंब दर्शनाने अंतरी धन्य सजल आर्या

  • टकाटक – “In full swing”

    बाया बापे बनुन टकाटक आले लावण करावयाला चिखलामधली रोपे उचलत पावसात तनु भिजावयाला इरली डोईवरती त्यांच्या रंगबिरंगी किलतानाची कधी न वाटे भीति तयांना अस्मानीच्या सुलतानाची शेतामध्ये उभ्या आडव्या करून ओळी अंतर राखत धारांमध्ये न्हात कुणबिणी गाती गाणी रोपे लावत हरेक तरुला वाढायाला जागा मिळुदे डुलावयाला प्रकाश पाणी यांच्यासंगे वारा मिळुदे डुलावयाला वेगे वेगे उंचच जावे…

  • नमिते -“The divine in me bows to the divine in you”

    मी जे लिहिते त्यातुन सुंदर सारे निघते मी जे जपते त्यातुन सुंदर सारे निघते घास टाकुनी जात्यामध्ये भरून ओंजळ मी जे दळते त्यातुन सुंदर सारे निघते जीवांना रक्षाया अविरत सत्य जाणुनी मी जे रचते त्यातुन सुंदर सारे निघते गोष्टींमधुनी विचार शिवरुप मनी मुलांच्या मी जे भरते त्यातुन सुंदर सारे निघते ब्रह्मांडातिल अन सृष्टीतिल मम पिंडातिल…