Tag: MARATHI LITERATURE

  • शिशिर ऋतू – SHISHIR RUTU (winter season)

    शिशिर ऋतू मी शिशिर ऋतू मम ह्रदयाचे पाच ऋतू घर बर्फाचे बांधुन मी तयात बघतो राहुन मी कधी झोपतो निवांत मी म्हणत वसंत ये ये तू संगे त्याच्या बागडतो वठली खोडे पालवतो वाद्ये मंजुळ वाजवतो ग्रीष्मासंगे जात उतू कुंकुम वर्णी निसर्ग हा हिरवाईने नटे धरा खाउन आंबे फणस गरा म्हणतो वर्षे कोसळ तू मीच धबधबा…

  • सत्य – SATYA (truth)

    जिंकणार सत्य आज वाजणार सत्य आज पाहताच मुग्ध भाव उमलणार सत्य आज शुभ्र मेघ अंबरात हासणार सत्य आज वीज नाचता नभात वर्षणार सत्य आज खोडसाळ जो तयास चोपणार  सत्य आज आत्मरूप दर्पणात भाळणार सत्य आज नेत्र नयन लोचनात झळकणार सत्य आज वृत्त – गा ल, गा ल, गा ल, गा ल.

  • शहारे – SHAHARE (tremors)

    आठवले मज वेडे सारे पुष्प-सुगंधित झाले वारे पापण काठी मौनी अश्रू नकळत त्यांचे बनले तारे मुग्ध मधुर ते रूप परंतू मम नेत्रांवर सक्त पहारे भेटायाला उत्सुक कोणी म्हणुनी जपले क्षण मी खारे माझ्या इच्छा दवबिंदूसम पुण्य असे जणू तप्त निखारे वाजविण्या मन तबला सुंदर काया पिटते ढोल नगारे प्रेम खरे पण रंग बघाया बदलत गेले…

  • विचार मंथन – VICHAR MANTHAN (thought process)

    रक्षाबंधन व्रत अमुचे माता रक्षण व्रत अमुचे छत्र जपाया वडिलांचे कुंकुम औक्षण व्रत अमुचे स्वतःच बांधू करी अता सम्यक कंकण व्रत अमुचे घरास खिडक्या दरवाजे ठेवू अंगण व्रत अमुचे सुगंध देण्या जगताला होऊ चंदन व्रत अमुचे श्वास मोकळा करावया फुलवू नंदन व्रत अमुचे नीर सुनेत्रा खळखळण्या विचार मंथन व्रत अमुचे मात्रा-चौदा=(आठ+सहा), १४=८+६

  • सजग कहाणी – SAJAG KAHANI (aware story)

    पृथ्वी पाणी, अंबर वारा सालामध्ये, महिने बारा चैत्र आदि जर, अंत फाल्गुनी पुनश्च फुलवी, सतेज अग्नी सुरू कराया, नेत्र दिवाणी सहा ऋतूंची, सजग कहाणी वसंत देई, वासंतिक क्षण हसते फुलते, अवघे तन मन ग्रीष्मामधली, ग्रीष्म झळाळी पांगविते घन, छाया काळी वर्षा धारा, वर्ष सजविते बीज तरू फळ, शेती जपते हेमंतातिल, हेमश्रीमंती प्रदान करिते, भूवर शांती…

  • बारमास गीत – BAR-MAS GEET (song of twelve months)

    चैत्रात उधळे नाविन्य कोणी वैशाख खोदतो कांचन खाणी ज्येष्ठोबा गातो पावन गाणी आषाढ दिक्पाल रावण मानी रंगात भिजणार श्रावण राणी भादवा हासतो जिंकुन ठाणी धान्याच्या भरेल आश्विन गोणी दिव्यांनी सजणार कार्तिक वाणी मार्गशीर्ष बांधे तोरण पाणी पौषात लुटावी गुलाब दाणी माघात लाघव लावण्य मौनी सुनेत्रा रंगीत फाल्गुन सोनी मात्रा-अठरा(१८)

  • राणी – RANI (queen)

    मी मुक्त मनाने, लिहित राहिले काही; उघडली दिशांची, मौन अंतरे दाही! त्या गात म्हणाल्या, मम हृदयाची गाणी; “सावळ्या धरेला अंबर म्हणते राणी”… रुबाई – मात्रा बावीस(दहा+बारा), २२=१०+१२