-
फूड – FOOD
चवदावे रत्न …. सुबक ठेंगणी वय चवदाची गझल देखणी सय चवदाची रत्न रुबाई हे चवदावे बाईपण मम मजला भावे … बटुव्याची खीर…. मी कणिक तिंबुनी गोळा केला बाई … अन हात चोळले हातावरती बाई… पाऊस बरसता बटुव्यांचा झरझरा … कढईत बटुवे भरले मग भरभरा … ठेवुनी चुलीवर केली विचारपूस … साजूक तुपावर परतून ते खरपूस…
-
सैपाक – SAIPAAK
पहाट झाली बाई आता- सैपाकाची घाई विसळ भांडी विसळ गुंडीत ताक घुसळ मळ कणिक मळ दाब नळाची कळ पालेभाजी ताजी धुवून चिर भाजी फोडणी घाल झकास खमंग तिखट खास पोळ्या लाट पोळ्या मऊ मऊ पातळ भाज हलके हलके करू नको वातड गोल गोल डबा त्याला स्वच्छ धुवा कोरडा छान करा त्यात जेवण भरा
-
पाक-कृती – PAAK-KRUTEE
In this poem the poetess describes the procedure (रेसिपी) of making Rose-balls(Gulab-jamun). शुगर शर्करा शक्कर चीनी ढवळ पाक जल साखर तपवुनि खव्यात मैदा सोडा मिसळुनि पिठास मळ त्या फेटफेटुनी मृदूल तळवे फिरव फिरवुनी चेंडूसम मग जाम बनवुनि शुद्ध तुपाला उकळी आणुनी तळुन रंग दे त्यास जामुनी गुलाबजामुन सच्छिद्र करुनि पाक त्यावरी ओत भरूनी बाउलमध्ये ठेव…