Tag: Marathi Stree-geet

  • कान-कावळा – KAAN-KAVALA (container of edible oil)

    कधी कधी मी टांगेवाली कधी कधी अन भांडेवाली भांडेवाली मी नखर्याची करे धुलाई हर पात्रांची कधी डोईवर घेउन हारा विकते भांडी दारोदारा सुबक ठेंगणा लठ्ठ सावळा तेल भराया कान-कावळा तेलाने जेंव्हा कळकटतो जोर लावुनी घास घासते धरुन नळाच्या धारेखाली स्नान घालते त्यास सकाळी तयात ओतून गोडेतेला नीट ठेवते वरी टेबला बांधुन बुचडा मग केसांचा फडशा…

  • अंगण गाणे – ANGAN GAANE (courtyard song)

    चलागं  पोरींनो गाऊया अंगणी रांगोळी काढूया रेषेतं  ठिपके मांडूया कलेकलेने जोडूया चित्रातं  घरकुल सजवूया घरासं  खिडक्या ठेवूया दारासं  तोरण बांधूया गाईची पाऊले रेखूया गाईला गोठ्यात आणूया वासरां जवळ घेऊया दोघांना चारा घालूया झऱ्याचं  पाणी पाजूया अंगणी रातीला जमूया उखाणे सुंदर गुंफूया झिम्मा नी फुगडी खेळूया चंद्राचं चांदणं पेरूया

  • काया अनमोल – KAAYAA ANAMOL(precious body)

    प्राजक्ताचे देठ जणु, ओठ तुझे जर्द बाई, ओठ तुझे जर्द गुलाबाच्या फुलापरी, गाल तुझे लाल बाई,  गाल तुझे लाल बागेतल्या भृन्गासम, कृष्ण तुझे नेत्र बाई, कृष्ण तुझे नेत्र सावळ्या या मुखावरी, चाफेकळी नाक बाई, चाफेकळी नाक कुंडलात शोभणारे, कान तुझे छान बाई, कान तुझे छान श्यामरंगी घनापरी, केस तुझे दाट बाई, केस तुझे दाट पौर्णिमेच्या…

  • श्रावणा रे – SRAVANA RE (” oh beautiful shravan month)

    श्रावणा रे शिंप झारी पंचमीला आल्या पोरी देऊळात राऊळात मंदिरात रागदारी सोनसळी ऊन झरे अंगणात घरीदारी ये ग सरी ये ग सरी भिजवाया मन भारी                                                            …

  • शेजी काशी गौराई – SHEJI KASHI GOURAI ( female neighbours)

    This poem is Stree-geet or Lok-geet. Women sing such type of songs in the festivals which are celebrated in rainy season, specially in Shraavan,  Bhaadrapad, Aashvin and kaartik month. शेजी काशी गौराई हळद लाविते सखी सई घटात भरते नीराक्का श्यामल चंदन ताराक्का कुंकुमवर्णी कळसाई जशी सुलोचन पद्माई इंदूवदनी अंबाई दुर्वांची मृदु हिरवाई फुलाफळांची नवलाई दीदी जीजी गुणवंती ताई…

  • बोल ग ठमा – BOL GA THAMAA (“say something, dear girl”)

    This song is known as Lok-geet(folk-song) in Maraathee language. This song is a parody poem based on the original song Naach ga Ghumaa(नाच गं घुमा). बोल गं ठमा! कशी मी बोलू? रागावते, ओरडते आवशी माझी! कशी मी बोलू! रावा की राघू तो, पोपट शुक-शुक का करतो? किल्ली  दे त्या हळूहळू, रडेल मग तो बुळूबुळू! मिठू मिठू…

  • दळण – DALAN (GRINDING)

    This Ghazal is written in ten(10) matras. In this Ghazal dot given on some letters is not anusvar(अनुस्वार); it is for giving lay(लय) to that letter. दळण दळणं सरलं गं घुमत जगणं सरलं गं अवचित सुटलं ग्रहण कुढत बसणं सरलं गं धुणं बडवणं सुकवणं वरण हटणं सरलं गं चुकणं बिकणं असतंच पण बिचकणं सरलंगं हरणं…