-
हिवाळी चऱ्हाट – HIWALI CHARHAT
हिवाळी चऱ्हाट …मुक्तक रुबाई चारोळी तंबाखू .. हिवाळी ऊस सोयाबीन ज्वारी डोल डोले गव्हासंगे खुली शेती सुपारी डोल डोले हवा गाई दवारूनी दळे दळण मरुदेवी उभ्या वाफ्यात तंबाखू गवारी डोल डोले पानमळा .. बाजरी कपाशी मका पानमळा सावळा सावलीत बसुनी विडा खात चऱ्हाटा वळा टेकलेय क्षितिज जिथे शुभ्र घनांची शिडी कार्तिकात निर्झरात कृष्ण निळा सावळा…
-
तथा – TATHA
मुक्तक… जन्मोजन्मी .. सौन्दर्याची दृष्टी ज्ञानी जन्मोजन्मी सद्धर्माचे पाजे पाणी जन्मोजन्मी मुनी मनातील मौन व्रताचे करू पारणे प्राशुन आगम धारा वाणी जन्मोजन्मी गझल … जथा.. कथा कुणाची व्यथा कुणाला भृगू स्मृतीची प्रथा कुणाला भरून गाणे उरात पोकळ फुका पुकारे जथा कुणाला कुणास भावे उकल कराया कपात चर्चा वृथा कुणाला उजाड राने रिते जलाशय म्हणेल पृथ्वी…
-
लवंग …आणि दोन मुक्तके
लवंग …आणि दोन मुक्तके लवंग जशी आमटी मस्त कटाची तवंग द्रव्यावरी तुझी तुला लखलाभ प्रसिद्धी सवंग द्रव्यावरी भावमनाची होडी आली तरून काठावरी अर्घ्य द्यावया पुष्प वाहिले लवंग पाण्यावरी धाव जपणे स्वभाव अपुला काव्यास पण जपावे वृत्तात मांडताना काव्यास पण जपावे घन शब्द अंतरीचे वाऱ्यासवे हलूनी शेरात धाव घेता काव्यास पण जपावे केतू शनी असो वा…
-
आलेख – ALEKH
चपला … पत्रामधले भाव अक्षरी जांभुळलेले मेघ जणु जलद गतीने झरे लेखणी चपला घेते वेग जणु मुसळधार पाऊस कोसळे घनमालेतुन परसात परिमल भिजल्या बकुळ तळीचा दूर पोचला शहरात कांदा … पाऊस उभा थरथरतो कोसळताना होत जांभळा सळसळतो कोसळताना कापता वीज कांद्यासम उलगडताना पापण्यांतुनी झरझरतो कोसळताना पेग… लाटांतुन उसळे भरतीचा आवेग अंबरी झळकतो बिजलीचाआलेख चल घेऊ…
-
खलास – KHALAAS
खलास … मुक्तक खलास करते रण अतिरेकी डोके एखादे खलात कुटते चिकणि सुपारी डोके एखादे गडे काफिया मुक्तकातला ओळख सुंदर रफार ई वर जणु वेलांटी डोके एखादे अलबेली … मुक्तक जशी टोकरी हवी हवेली हवी तशीच मैत्री मज अलबेली हवी कुसुमांकित तनु पर्ण चित्र पाऊस अशीच छत्री कवीस वेली हवी
-
गोडवा – GODVAA
मी मौनाशी मैत्री केली मौनातच मम आरोळी शब्दांसंगे खेळ कागदी भरते कर्मांची झोळी अधरांवर तर्जनी न नाचे साक्षीभावे अचल उभी मकरंदी गोडवा गुळाचा निर्जरेस नव चारोळी
-
मधुरस – MADHURAS
मुग्ध मधुरस माय मराठीचा मज मिळतो मुग्ध मधुमित माता मम्मीचा मज मिळतो मोरणी मी मित्रत्वाची मान मनोरम मुग्ध मालन माल मोजता मसि मध मिळतो