Tag: suneet

  • घाबरू कशाला – GHAABAROO KASHAALAA

    घाबरू कशाला काळास म्हणते लेखणी कापे कडे राहुनी काळासवे लंबकापरी आंदोले मागे पुढे पाहता ती मान वेळावुनी मागे थबकतो काळही मुग्ध होतो पाहून कृष्ण तिचिया अधरी ग बासरी लेखणीच शिकवते नवी भाषा खुल्या वर्तमानाला आणते भानावरी भूतकाळास फोडते भविष्याला आजमावे शक्ती अणुकणांतील ना राहते गाफील चौफेर फिरे दाही दिशात पण हातात नाही ढाल घुसमटता ऊर…

  • बंधमुक्त – BANDH MUKT

    प्रतिभेने मज माध्यम दिधले काव्य व्यक्त व्हावया अंतर म्हणते लिही लिही मन बंधमुक्त व्हावया प्रिय मज माध्यम काव्यच आहे अन्य माध्यमाहुनी भजते जपते शब्दाक्षर मी काव्यभक्त व्हावया काळोखाला उसवुन रगडुन घडीव पाट्यावरी गाळत बसते भाव गडद मी स्वच्छ रक्त व्हावया पहाट सुरभित शीतल शुभ्रा प्रसाद देण्या शुद्ध ओंजळीत मम दव सांडविते एकभुक्त व्हावया झरते पडते…

  • कवयित्री – KAVAYITREE

    कोण काय म्हणेल कशास चिंता करिशी कवयित्री कवित्वाचा दागिना तुला लाभला झळाळणारा खरा हृदयातुनी तुझ्या वाहे प्रेमाचा खळाळणारा झरा काव्यातुनी उधळशी हिरे मोती नाही कुठे तू उणी राहू केतू ग्रहांची तुला ना पीडा तुला न वक्री शनी शिडीविना पोचतेस तारांगणी उडोनी पंखाविना वेचशी तारे नभीचे गुंफावया गजरा सुईविना समान तुला पुनव अमावस हिंडतेस ग्रहणी रानात…

  • गझनीत – GAZNEET (SONNET)

    सुरभीतराई हळद माखुनी कनकलता भासे गिरवून मात्रा जलद सावळ्या सलिलसुता भासे अडवून वाऱ्या गडद रांगड्या सळसळता पर्णे समशेरधारी रजत दामिनी रण दुहिता भासे कदली दलांच्या हरित मांडवी अनवट कोड्यांनी लय सूर ताली भरुन सांडण्या घट हलता भासे वसने दिशांची घन निळे धुके मलमल बाष्पाची विखरून देता किरण तांबडा कलश रिता भासे पिवळ्या जमीनी कुरण जांभळे…

  • माझे सॉनेट – MAAZE SONNET (SUNEET)

    आम्ही मेघ सावळे दाटता नभी अश्वांवर बसूनी झिंगतो वात हूड वीज आसूड घुमवी कडकडा उधळतात अश्व चौखूर आम्ही कोसळू धडधडा कडा ओतेल मौक्तिके शुभहस्ते ओंजळीत भरूनी धनधान्य पिकवतील ग्रामस्थ नीरास वळवूनी भागवू तहान धरणांची सांडू लोळून गडगडा व्हावयास बाष्प हलके तापून उकळू तडतडा लहरण्या मुक्त विहरण्या मोदे वर जाऊ उडूनी अदृश्य होऊन फिरू तारांगणी नक्षत्रफुले…