-
उधारी – UDHAARI (BORROWING)
मादक ओठांवरची मदिरा प्राशायाला हवी झिंग तयातिल चालीमध्ये मुरवायाला हवी स्पर्शाने मम उसळुन येता तव इच्छांचे नीर दो हातांनी लाट रुपेरी अडवायाला हवी मधुर गुपित चिरतारुण्याचे कळण्या मजला खरे तव नजरेतिल तडका मिरची चाखायाला हवी मिटशिल जेंव्हा नेत्रदलांना श्यामल तनूवरचे.. साठवुनी दव त्यातच मेंदी भिजवायाला हवी कुणास वाटे चोरी मारी असली तरही गझल.. कल्पकतेची म्हणे…
-
भोला – BHOLAA (NAIVE)
तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची कुठे मनाला खोलायाची सोयच नाही आता म्हणेन कोणा भोला याची सोयच नाही आता इतुके त्यांनी जीव कोलले मनोरंजनासाठी विटीस सुद्धा कोलायाची सोयच नाही आता नंदीबैलासमान त्यांनी डोलविल्यावर माना सुरांवरीही डोलायाची सोयच नाही आता मीच कातडे सोलत जाता माझ्या कायेवरले पक्व केळही सोलायाची सोयच नाही आता…
-
खरे बोलणे – KHARE BOLANE (speaking truth)
तरही गझल – खरे बोलणे वेड आहे खरे (गझलेची पहिली ओळ,ऋतू हा फुलांचा तुझ्यासारखा…आदरणीय कवी राज पठाण यांची) ऋतू हा फुलांचा तुझ्यासारखा कसा रोज वाटे नव्यासारखा झरोक्यातुनी चंद्र दिसतो मला जणू सोनचाफा दिव्यासारखा जुळे भाव ना पण जुळे काफिया थकुन शेर बैसे खुळ्यासारखा पुसावी लिहावी गझल मी सदा तुझा शेर यावा निळ्यासारखा निळ्या या नभाची…
-
विश्वास – VISHVAAS (faith)
-
मी पुन्हा जन्मले होते – MEE PUNHAA JANMALE HOTE
तरही गझल – मी पुन्हा जन्मले होते गझलेची पहिली ओळ कवी राज पठाण यांची. जगण्याची इच्छा नव्हती मरणाने छळले होते मरणाच्या उंबरठ्यावर मी पुन्हा जन्मले होते मज वाढायाचे होते जन्मात नव्या या सुंदर पण तनू खंगली झिजली म्हणुनच हळहळले होते नव्हताच दुवा कुठलाही जोडाया नाते अपुले तू समक्ष खात्री द्यावी यासाठी अडले होते मज थोडे…
-
कंटकांचा हार झाला – KANTAKAANCHAA HAAR ZAALAA
तरही गझल – कंटकांचा हार झाला गझलेची पहिली ओळ कवी राज पठाण यांची. घुसमटीचा केवढा सत्कार झाला आतला आवाज पुरता ठार झाला बोलले होते जरी ते बोचणारे बोचऱ्या त्या कंटकांचा हार झाला लेखणीने दाबता नाना कळांना शेर माझा वीजवाहक तार झाला वितळलेल्या भावनांना अर्थ देण्या गोठवुन पाल्हाळ तो मग सार झाला केवढा आधार त्याला कुंपणाचा…
-
कृष्ण ढग – Black cloud
तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी- हरवलेलं मन A Poet यांची तू ही अशी उभी रहा माझ्या मनाच्या अंगणी हरवलेले मन घुंगरु वाजे गणाच्या अंगणी हरवलेले मन घुंगरु वाजे गणाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई फुल श्रावणाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई फुल श्रावणाच्या अंगणी नर्तकीला लाजवुनी रे नाच नाच्या अंगणी नर्तकीला लाजवुनी रे नाच नाच्या अंगणी…