This is a parody poem. Original poem is ‘dhund madhumati rat re'(धुंद मधुमती रात रे) famous song in marathi film ‘Kichak vadh’.
रुंद हनुवटी ताठ रे नाक रे
लहरी सम हे कुरळे कुंतल
भाव लोचनी अवखळ चंचल
गुलाबी जाहले गाल रे भाल रे
कुंडल नाही कर्ण डोलती
कंकण नाही कर किणकिणती
छुमछूम वाजती पाय रे नाच रे
येना रे लवकर फूलपाखरा
हा संपेल आता ऋतू
हसतील कोटी बागा
कशी मी तुझ्याविना रे हसू
दवबिंदूंचे मधुर सुवासिक
अमृत तूही प्राशरे हास रे