Tag: Marathi sahitya

  • कलादालन – ART GALLERY

    कलादालन तैलचित्रे कुशल करांची विशुद्ध किमया कलादालन भाव भरल्या सजल करांची विशुद्ध किमया चित्रांमध्ये या चाले  मुक्त जरी रंगांची दंगल कला दालन न्याय देण्या विमल करांची विशुद्ध किमया ऊर्ध्व वेग घे जलद गती ओंजळ भरली हृदय मंदिरी कलादालन ग्राम नगरी कमल करांची विशुद्ध किमया ध्येयवेडी ब्रम्हभूमी चैतन्याने सळसळणारी कलादालन सरळ वर्षा अनल करांची विशुद्ध किमया…

  • ज्ञान – KNOWLEDGE

    सम्यक दर्शन अनुराग जिनांवर तन्मय होता मम राग जिनांवर स्तोत्र स्तुती रचते मी अक्षरांत ज्ञान शील तन धन राग जिनांवर

  • देहाचं तारू – my body’s ship

    माझ्या देहाचं तारू देहाचं तारू मी सोडलंय ग माझ्या मनाचं वारू मी सोडलंय ग दर्याला भरती आलीया बाई आलीया तनामनाचं गलबत म्या सोडलंया बाई सोडलंया माझ्या मनाच्या शिडात जिनभक्तीचं वारं भरलया बाई भरलया माझ्या देहाचं तारू मी सोडलंय ग … माझ्या गळ्यात गाणं दाटलंय ग माझ्या तळ्यात पाणी झरतंय ग उरात अक्षर भांडार भांडार भरलाय…

  • कैफियत – SITUATION

    हृदय सरोवर मम देहातील त्यात उमलले पद्म सुकोमल पद्म न लांच्छन पद्मपभूला ते तर शुद्धात्मा जिन ईश्वर सुमतीनाथ न चकवा देती तपोलीन तन आत्मा पक्षी अभिनंदन संभव तीर्थंकर अजितनाथ जिन वृषभ जिनेश्वर सुपार्श्व् स्वस्तिकात स्थापते अर्थ कधी ना विपरीत काढे म्हणून मन मम स्थिर शांतीत चंद्रप्रभूसम सिद्धशिलेवर मैफल भरली इथे वहीवर कैफियत मांडण्या भराभर लिहीत…

  • कैफियत – Explanation

    माती मिसळुन गढूळ जेव्हा लोंढा आला आला खंदकातुनी खळाळणारा गटार नाला आला ज्या ना खपल्या पडुन राहिल्या तश्याच खोक्यामध्ये वर्ष संपता त्यांना विकण्या साडीवाला आला मैफलीत तू मांड कैफियत तुझिया मुख्यार्थाची संसदेतला दलाल मजला सांगायाला आला मूळ स्वभावा परतुन येता मानवप्राणी देवा धर्म अहिंसा परमहंस जिनगुरू म्हणाला आला शिकवत आहे गझलविधा मम मंत्र जगाया जगव…

  • आयडीया – IDEA

    तीन शेरांचे मुक्तक सत्याच्या मार्गावर चालूनी कसरत करायची टोकावरुनी गाठण्यास पायथ्यास घसरत करायची जीवन सत्यातून निखरण्या होऊन मौनालिसा खास आयडीया काव्यामधुनी पसरत करायची घागर फुंकुन घागर घुमवत श्वासातूनी शुचिता तनमन शांतीसाठी मुख्यार्थाची हसरत करायची

  • दुहिता – Daughter, River

    भूमीताई सांग कसे मी होऊ तव उतराई तुझ्या क्षमेची दिगंत कीर्ती गाते दुहिता माई निर्झर बाळे अवखळ पेलत अंगाखांद्यावरी शुद्ध नीर साठवण्या ह्रदयी खळगे ठाई ठाई तलाव विहिरी धरण सरोवर समुद्र सागर ओढे तव कायेवर आश्रय घेती तू तर त्यांची आई सातपुडा सह्याद्री मांगी विंध्य हिमालय तुंगी सम्मेद शिखर कैलास गिरिची तू माता बाई नंदनवन…