कसं नि कायं कळेना – KASA NI KAAYA KALENAA


This poem is known as folksong or lokgeet. In this poem the poetess gives message, if you want to run a macnine regularly, daily care  and maintainance is necessary together with real knowledge.

कसं नि कायं कळेना
माझी गिरण पीठ दळेना

मी आणला नवीन पट्टा
अन चाकाला घातला रट्टा
वारा घालाया आणला पुठ्ठा
तरी जातं कसं हे हलेना
कसं नि कायं कळेना
माझी गिरण पीठ दळेना

ठाकठोक केली हातोड्यानी
केले इंजिनाला तेलपाणी
त्याच्यापुढे मी गाईली गाणी
पण चाक कसं हे पळेना
कसं नि कायं कळेना
माझी गिरण पीठ दळेना

साद घातली माझ्या सईला
तिने आणले वायरमनला
त्याने झटक्यात फ्यूज बदलला
चक्र लागले वेगे फिरायला
गर्दी दळणांची आता हटेना
कसं नि कायं कळेना
माझी गिरण आता रुसेना

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.