This poem is written for children. This song is known as bal-kavya.
अंगणात दंगा करतंय कोण?
कोण कुणाला करतंय फोन?
ही तर आपली गुबरी माऊ,
ससोबाला म्हणतेय काय, काय भाऊ?
येना अंगणात करायला दंगा,
वाऱ्यासंगे घालायला पिंगा!
ससोबा येताच चिमण्यांनी घेरलं,
रानपाखरांनी अंगण भरलं!
किलबिल ऐकून बाळ हसलं,
हसता हसता धपकन पडलं,
भोकाड पसरून रडायला लागलं!