चाफा मंद मंद – CHAAFAA MAND MAND


कवी बी यांच्या चाफा बोलेना चाफा चालेना या चालीवर आधारित विडंबन
~~~~~~~
चाफा हिरवा चाफा पिवळा
चाफा मंद मंद गंध उधळीत हसला …
गेला बागेतुन घरी
उधळित सुगंध सरी
मन आनंदे भरी
त्याचा रंग मला खूप भावला…
चाफा मंद मंद गंध उधळीत हसला …
चाफा ठेवुन मेजावर
फोटो खेचले झरझर
धाडुन वॉटसपावर
मोद ओसंडून सांडला
चाफा मंद मंद गंध उधळीत हसला …
चाफा बोलला खरे
चाफा हासला बरे
सांग कोणावर मरे
त्याचा आवाज मी आज ऐकला …
चाफा मंद मंद गंध उधळीत हसला …


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.