This poem is a parody poem(विडंबन काव्य) based on the poem ‘Dahaa vees asatee kaa re mane uddhavaa’.
दहा वीस असती कारे मने उद्धवा, गीत-ग.दि.माडगुळकर, संगीत-स्नेहल भाटकर, स्वर-सुमन कल्याणपूर).
In this poem, ‘Thev Tajavaa'(ठेव ताजवा), the word, ‘Raadh’ means our soul or Atmaa. The poetess says that it is necessary to get to the depths of our thoughts and feelings before deriving some meaning out of them.
सात आठ असती कारे, शिरे दानवा;
एक तुला तेही तारण, ठेविलेस का!
कर्ण नाक जीभ नयन, त्वचा जाणते रे
जसा मना हवा तसा, रंग खेळते रे
दोष नको देऊ कोणा, भाव जाणना!
भावनेस पेटवून, असुर नाचती
गोठवुनी बर्फासम, सुर झोप घेती
प्रकृतीत भिजव तुझी, प्रेम कामना!
एक देह एक हृदय, राध पाहणारे
भावनेस तोल फक्त, भान ठेवुनी रे
क्षणोक्षणी बदलतात, वजन भावना!
वास्तवास विकृत करिती, स्वैर कल्पना
किती तुझा यत्न स्तुत्य, भाव तोलण्याचा
पुरे अता मोजमाप, ठेव ताजवा!