This poem is a parody poem(vidamban kavya) based on the poem ‘Aamuchee vasane de shreeharee’ written by G.M. madgulakar
आमुची वसने दे श्री हरी (गीत- ग.दि.माडगुळकर, संगीत-स्नेहल भाटकर, स्वर-सुमन कल्याणपूर
तळपती शस्त्रे निलाजरी
द्यालका वस्त्रे कुणीतरी!
जात बाईची वा पुरुषाची
भूक शमविण्या देह-मनाची
लाट बने सागरी-
द्यालका वस्त्रे कुणीतरी!
रंग खेळुनी वास गळाले
अर्थ लाजले भाव पळाले
येऊद्या मंदिरी-
द्यालका वस्त्रे कुणीतरी!
घर काचेचे नीतळ माझे
वाऱ्याने मन-झुंबर वाजे
अधरांवर बासरी-
द्यालका वस्त्रे कुणीतरी!
बुडले तरले वेग झेलले
पुन्हा पुन्हा मी चिंब जाहले
राधा पण बावरी-
द्यालका वस्त्रे कुणीतरी!