This is a parody poem (विडंबन) written on the original poem, ‘patraat lihuoo mee kaay tulaa( पत्रात लिहू मी काय तुला?).
दे पत्र सईचे खास मला,
घे काव्य तयातिल तूच फुला!
शुक्र खराकी ध्रुव खरा रे?
या भूमीचा खरा सखा रे?
कुणास कळली किती धरा रे?
प्रश्न घालतो पवन जला!
अधरी माझ्या नाव उमलते
नेत्रांमध्ये भाव फुलवते
लिहून गझला हृदय झुलवते,
ये रे वाट पहातो झुला!
लिहावयाची कसली भीती,
कशास पाळू नकली रीती ,
केली मीरे खरेच प्रीती
सुख मिळेल सारे तुझे तुला!