Category: marathi kavya

  • दुहिता – Daughter, River

    भूमीताई सांग कसे मी होऊ तव उतराई तुझ्या क्षमेची दिगंत कीर्ती गाते दुहिता माई निर्झर बाळे अवखळ पेलत अंगाखांद्यावरी शुद्ध नीर साठवण्या ह्रदयी खळगे ठाई ठाई तलाव विहिरी धरण सरोवर समुद्र सागर ओढे तव कायेवर आश्रय घेती तू तर त्यांची आई सातपुडा सह्याद्री मांगी विंध्य हिमालय तुंगी सम्मेद शिखर कैलास गिरिची तू माता बाई नंदनवन…

  • न्याय – JUSTICE

    कती स्पष्ट बोल खटकती झोंबती जर्द कती लाल ती अलक ती गोष्ट न अलना गझलच लिहिली ओवाळुन आरती कनक ती गझल घड केळ्यांचा विकत मिळाला घडावरी घड फुकट मिळाला सवलत खासच बिग बाजारी भरून गाडी माल मिळाला बिगी बिगी कुणबिणी निघाल्या त्यांना लावण जॉब मिळाला तिखट कटीवर बरणीमध्ये मम चालीला ताल मिळाला सूर ताल लय…

  • हे झाड सांगते गुज मला ! – “This tree is telling me its secrets”

    हे झाड सांगते काय मला `.. कथा सांगते जणु मजला.. गुजगोष्ट सांगते  मला… पानांच्या ओठातुन हसते..हळुवार सळसळते सांगते.., ” या दगडी भिंतींचा भक्कम शेजार मला! प्रभातीस हे ऊन कोवळे ..भाद्रपदातील .. खेळते बागडते माझ्या देहावरती ..या दगडी भिंतींवरती.. इथल्या भूमीच्या कणकणावर …मुक्तपणे…! हवा वाहते शीतल झुळझुळ … परिमल भिजल्या पानफुलांचा…ओल्या खोडांच्या सालीचा .. अन मातीचा…

  • क्षमा भाव गुण – “The virtu of forgiveness”

    जास्वंदी की जपा म्हणू मी कुक्षी की कुंडले स्मरू मी रंग गुलाबी केसर कणकण बीज मण्यांना कसे धरू मी कणकण वाटे तुज तापाची यावर कैसे बरे हसू मी दुभत्या भाकड जित्राबांनां खाटकास का विकू झुकू मी जीवास देते जीव अश्या मम लेखणीस का म्यान करू मी सुजला सुफला देह संपदा जमीन फुंकुन का टाकू मी…

  • सुखद गारवा – “pleasant coolness”

    पीत गुलाबी दल पर्णांकित खोड उभे पाठी नाजुक कुसुमांच्या रंगांच्या सोडविण्या गाठी झाड फुलांनी भरून गेले पानांची गर्दी हलवुन फांद्या मीच पाडला पाऊस माझ्यासाठी भल्या पहाटे सुखद गारवा हवा लपेटुन तना भिजल्या वाटेवरुन जातसे गात पुढे मी मना मना तुझिया संगे करते मी गप्पागोष्टी मोर कोकिळा साद घालती संवादासाठी चला उमटू द्या अंतरातुनी हवेहवेसे गीत…

  • जीव सृष्टि -living beings

    पृथ्वी कायिक जीव सृष्टि गोवा दमण व दीव सृष्टि करुणा ममतेची मूर्ती पण ना करते कीव सृष्टि स्पर्श कराया प्रीतीने दोन करांनी शीव सृष्टि वृक्ष तरू तण एकेंद्रिय पुद्गल द्रव्य अजीव सृष्टि निसर्ग मानव ग्रह तारे उत्क्रांतीची नीव सृष्टि

  • मडगार्ड – MUDGUARD

    मडगार्ड की पडल मडी घोंगावते बझल मडी गा गा ल गा गा गा गा सोडव खरे पझल मडी राजीव नयनातिल जल प्रक्षाळते गझल मडी पैंजण पदी छुमछुमती फुलले पहा कमल मडी कळ कमळ दाबा सत्त्वर वाटेकरी अडल मडी