This poem is known as baal-geet. In this poem the poetess tells us , how much she loves books.
आवडते मज पुस्तक भारी!
गाणी गोष्टी मज्जा न्यारी!
चित्रे सुंदर रंगीत लोभस,
गोष्टीमधला प्रचंड राक्षस!
कवितेमधली आगीनगाडी,
मामाची ती बैलगाडी!
इथेच मजला परी भेटते,
आकाशाची सैर ही घडते!
आई बाबा ,दादा ताई,
प्रेमळ सुगरण आक्का बाई!
नात्यांची मज ओळख होते
फळा फुलांचे दर्शन घडते!
मनीमावशी,उंदीरमामा,
खारुताई, कावळेदादा,
यांच्यासंगे मैत्री होते!
म्हणून माझे पुस्तक वेडे,
खूप खूप मज खूप आवडे!