In this poem the poetess asks her beloved person to realize power of true love and emotions expressing true love.
भ्रमर भृंग काय म्हणू तूच सांग नाथा
हृदयातिल मधु बोले सोड भांग नाथा
थकलेरे पाहुनिया नित्य नवे चाळे
रिक्त पुन्हा जाहलेत नयनांचे गाळे
केकारव नको अता हवी बांग नाथा
निशीगंध मुग्ध धुंद प्रीतीची गाणी
शब्द निळे भवताली हळू बोल राणी
नवा तुझा बेत काय देच थांग नाथा
स्वप्नांनी सतत नभी उंच उंच नेले
मायेने पांघरले मोरपिशी शेले
मानवेल कशी बरे लांब रांग नाथा
भावनेस जाळतोस हाच गुन्हा मोठा
कुबड्यांना फेक लाव कलम पुन्हा ओठा
सायकलीवरी स्वतः मार टांग नाथा