मज्जा करूया! – MAJJA KARUYA! (Let’s Have Fun)


Summer holidays bring happiness to school-going boys and girls. They are happy because, in summer holidays, they can play, sing, dance and enjoy whatever they like, in their leisure time.

उन्हाळ्याची सुट्टी आली;
मज्जा करूया!
सोसायटीच्या पार्किंगमध्ये,
चेंडू खेळूया!
प्लास्टिकचा हा चेंडू बघा
टप्पे घेत नाही,
लोखंडाचा चेंडू तर-
उडतच नाही.
आपला रबरी चेंडू पळे किती-
थांबतच नाही.
पकडुन आपल्या चेंडूला
टप्पाटप्पी खेळू;
जास्त टप्पे कोणाचे ते-
भराभरा मोजू.
कोण जिंकलं? कोण हरलं?
वादावादी नको;
सुट्टी संपेल भांडा-भांडीत-
वाद आता नको.
आज जिंकू,उद्या हरू,
परवा आपण जिंकू;
तेरवा आपण वनभोजन
बगिच्यात करू.
तेरवाच्या पण तेरवा आता
नका बरे रडू!
संध्याकाळी बगीच्यात-
उडू-बागडू!
चला चला फुलांसंगे,
गप्पा-गोष्टी करा;
गाणी स्वत: रचा आणिक-
गोल गोल फिरा!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.