A lokgeet is basically a folksong. In villages people sing such songs at night, when they have time to relax. At this time of the day they dance to tunes of the folk songs merrily.
तान्हं करतंय किरीकिरी
पाऊस पडतोय झिरीझिरी
पोलिस मागतोय चिरीमिरी
नकोस फिरवू तू भिंगरी
मानाने तिज आण घरी
नजर भिरभिरे भिरीभिरी
सणक मस्तकी तिरीमिरी
पण ओठांवर हरीहरी
नकोस फिरवू तू भिंगरी
मानाने तिज आण घरी
डास भुणभुणे पिरीपिरी
पंख लावुनी उडे जरी
मनीमाऊला भिते परी
नकोस फिरवू तू भिंगरी
मानाने तिज आण घरी
नेऊन वारा तिला वरी
गंमत दाविल तुझी खरी
खास पाहुणी गोड भुरी
नकोस फिरवू तू भिंगरी
मानाने तिज आण घरी