This poem(baal-geet) is a parody poem(विडंबन काव्य) based on the poem,
‘Zuk zuk zuk zuk aageen gaadee'(झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी).
Aattee(आत्ती) means maternal uncle’s wife or father’s sister.
टप टप टप टप टांगा गाडी
दौडत दौडत घोडा ओढी
उडती पाखरे मोजूया
आत्तीच्या गावाला जाऊया
आत्ती भारी तापट
बोल बोलते लागट
कोंड्याचे मांडे खाऊया
आत्तीच्या गावाला जाऊया
आत्तीच्या गावी ना वाडा
नाही कचऱ्याचा राडा
डोंगर चढुनी पोचूया
आत्तीच्या गावाला जाऊया