This article is a translation of a pravachan (discourse) by Jain Guru Kshullak Shree Dhyaansagarjee Maharaj. This discourse is included in the book Kaivalya-Chandane. In this discourse, Maharaj describes the basic theory and technique of dhyan. Dhyan means doing nothing. In this process, you have to just ‘be’. Realizing the pure state of our soul is dhyan. It is different from ‘dharana’ – in which you focus or concentrate on a certain thing. However, dhyan is different from dharana. The process of dhyan involves clearing your mind of all thoughts.
वाचनिक, उपांशु, सगर्भ मानसिक, अगर्भ मानसिक आणि अजपा हे जपाचे पाच प्रकार आहेत. अजपा जाप आपल्या आताच सामावलेला असतो. श्रावक धर्मातही धर्माचा अभ्यास होऊ शकतो पण भावनेची विशुद्धी हवी. ध्यानात जसजसे आपण खोलवर पोहोचू तसतसे सामायिक आदीमध्ये शुद्ध भावना दिसू लागते.
ध्यानात स्थिर होण्यासाठी पद्मासनात बसावे किंवा पंचम काळातील श्रावकांना पर्यंकासन सांगितले आहे. जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ पर्यंकासनात बसून सामायिक करावे. सामायिक करायचे म्हणजे काय करायचे? मुनींनी एकदा आचार्यश्री विद्यासागर महाराजांना विचारले. आचार्यश्री म्हणाले, “काहीच नाही करायचे.”आध्यात्मिक दृष्टीने पहिले तर आपण
मा चिठ्ठ: म्हणजे शरीराने मूर्तीवत व्हा.
मा जंब: म्हणजे वचनांनीही काही करू नका.
मा चिंत: म्हणजे कशाचेही चिंतन करू नका.
शरीर, मन आणि वाणी हे सर्व काही शांत असेल तरच हे शक्य आहे. आत्म्याला आत्म्यात राहू द्या. त्याला कधी शरीरात, मनात, वचनात का आणता?
आतले बाहेरचे म्हणजे काय? आत काय असते? क्रोध, मान, माया, लोभ की शांती? आपल्या आतले स्वरूप म्हणजे आपलं अंतरंग. आतील कषायांना बाहेर काढण्याचा, इच्छारहित होण्याचा अभ्यास करणे म्हणजे ध्यान. मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही, माझे शरीरही माझे नाही अशा ध्यानाचा अभ्यास दिवसाच्या २४ तासात २४ सेकंद जरी केला तरी चालेल. हळूहळू ध्यानाचा अवधी वाढवीत गेल्यास अंतरंगात शांती येईल. कोणी जबरदस्ती अहंकार करेलकी मी आत्म्याला जाणतो तर ते खरे नाही. आत्म्याबद्दल माहिती असणारे करोडो असतील, पण आत्म्याला ओळखणारे खूप कमी असतात.
कितीतरी लोक आत्म्याबाबत संदेह बाळगतात. काही लोक जाणू इच्छितातकी खरेच आत्मा आहेका? कार्तिकेय अनुप्रेक्षेत म्हटले आहेकी आत्म्याला ओळखून आत्मस्वादात लीन असणारे तीन किंवा चारच असतील. पाच सहासुद्धा कठीणच. ध्यानाच्या आनंदात जाणारे खूप कमी असतात. आत्मानुभव घेणे एवढे सोपे आहेका? जर ते अतींद्रिय सुख प्राप्त झाले तर तो या संसाराच्या चिखलात कशाला राहील? मासोळी पाण्याबाहेर काढली तर ती किती तडफड करते? तर सांगायची गोष्ट ही आहेकी त्या आनंदाला प्राप्त करणारे जे साधू असतात त्यांना खाण्यापिण्यात, चालण्याबोलण्यातही तेच दिसते.
आत्मसुखाला प्राप्त केले असे म्हणणारे संसारी लोक या संसारात कसे राहतील? इंद्रिय जगताच्या बाहेरही जो येऊ शकत नाही तो आत्मसुखाच्या गप्पा का सांगेल? आजकाल ध्यानाचे जे विधी सांगितले जातात ते फक्त धारणेचे विधी असतात. त्या विचारपद्धती असतात. निर्देशक सांगतातकी असा विचार कराकी आपण ढगांनी वेढलेले आहोत. आपले शरीर हलके होत आहे. जर तसे आपल्याला वाटले, ढगांनी वेढल्यासारखे खूप हलके हलके वाटले; पण असे नका समजूकी आपण ध्यानाच्या खोलीत पोहोचलात. वर्षानुवर्षे तपश्चर्या करूनही मन स्थिर होत नाही.
एक गोष्ट आहे. एक अथांग समुद्र पसरलेला असतो. धक्क्याला एक जहाज थांबलेले असते. त्या जहाजाच्या शिडावर एक पोपट बसलेला असतो. तेथून दिसणारे समुद्राचे ते रूप त्याला मोह पडते. काही वेळाने जहाज हलते. किनारा सोडून प्रवासाला निघते. शिडावर बसलेला पोपट किनाऱ्याकडे पहात असतो.
पण जहाज हलताच शिडावरून उडून तो नेहमीसारखा आपल्या कुटुंबियात येत नाही. त्याला वाटते या जहाजाच्या शिडावर बसून समुद्रात दूरवर जावे. आत आत जावे. समुद्राचे वेगळे रूप पाहावे अनुभवावे.
जहाज निघाले, त्याच्याबरोबर पोपटही निघाला. जहाज खूप दूरदूर गेले. समुद्राच्या अगदी आत आत पोहोचले. सगळीकडे पसरलेले पाणीच पाणी आणि वर पहिले तर आकाशाची घनगंभीर निळाई! समुद्राचा तट अगदी दूर राहिलेला. दृष्टीपथात न येणारा. पोपट मग घाबरला. भीतीने त्याने आपले पंख फडफडवले. समुद्राचा तट, किनाऱ्याजवळची भूमी, त्याचे आप्तजन किती दूरदूर राहिले होते. पोपटाने पंख फडफडवून उडण्याचा प्रयास केला. पंखातली सारी ताकद एकवटून तो उडत राहिला. काही कि. मी. अंतर उडत उडत गेला. पण तरीही समुद्राचा किनारा कोठेच दिसत नव्हता. इथून पुढे उडणे त्याला शक्य नव्हते. मग त्याने पुन्हा सर्व शक्तीनिशी पंखातले सारे बळ एकवटले आणि तो तसाच उडत उडत परत त्या जहाजावर आला. मुनींची स्थिती अगदी अशीच असते. त्या पोपटासारखीच! त्यांना परत यावे वाटले तरी ते येऊ नाही शकत. ते परत त्या जहाजावरच येतात.
स्वाभाविक सुखांची प्राप्ती व्रतांशिवाय होत नाही. मुनी अवस्थेत, पुढच्या पुढच्या अवस्थेत मनाची अशी अदभूत स्थिती असते. त्या स्थितीत व्रतांमध्ये कष्ट वाटत नाही. साधूंना बाहयकष्ट, शरीरकष्ट झाले तरी त्यांना आतून जो आनंद मिळत असतो त्याला ते सोडत नाहीत. पण शेवटी एक दिवस असा येतोकी नेहमीसाठीच सारे झंझट कमी होते.
आपणा सर्वांना या मार्गावर कधीना कधी यायचेच आहे. आज कुणाला संदेह असेल, कष्टांची भीती वाटत असेल, श्रद्धा डळमळीत असेल पण शेवटी हेच सत्य आहे.