This poem is a song of various seasons in India. Every season has it’s own beauty. We must enjoy these seasons.
प्रीतीचा बघ शिशिर ही फुलला
वसंत वर्षा सावध सावध
शरद बोचरा करितो पारध
हेमंताने केले गारद
गुलमोहर खुलला
प्रीतीचा बघ शिशिर ही फुलला
विरह कसा मी साहू आता
खरेच जवळी राहू आता
प्रेमामध्ये न्हाऊ आता
खेळामधली रडकी राणी
राजाही चिडला
प्रीतीचा बघ शिशिर ही फुलला
सोडव मजला छळे उकाडा
मुक्तीसाठी हवा निवाडा
धरेस भरते नवा चुडा
बोलू सारे गाऊ आपण
ऋतु गाली हसला
प्रीतीचा बघ शिशिर ही फुलला