This poem is a parody poem based on the original poem written by
shri. G.M.madgulkar.
विडंबन काव्य-तुज कष्ट नको पण दाम हवा,
मूळ कविता-मज नकोत अश्रू घाम हवा, गीतकार-कविवर्य ग.दि.माडगुळकर,
संगीत-स्नेहल भाटकर, गायिका-सुमन कल्याणपूर
तुज कष्ट नको पण, दाम हवा!
हा तव तंत्रांचा, साम नवा!
दुध तपवुनी, साय जमवुनी,
विरजुन, घुसळुन, मिळते लोणी!
तूप मिळव तू, त्यास कढवुनी,
हे बाईचे तू, ऐक बुवा!
तुज कष्ट नको पण दाम हवा!
ठेव क्षीर तू, मंदाग्नीवर,
बोटांमध्ये, चमचा तू धर,
हलके हलके, हलव तुझा कर,
मिळेल मग तुज, मस्त खवा!
तुज कष्ट नको पण दाम हवा!
खरी संपदा, ही तर मोठी,
जीव धरेवर, जगण्यासाठी,
फळे गोमटी, मिळण्यासाठी,
प्रकाश, अन्न, नीर, शुद्ध हवा!
तुज कष्ट नको पण दाम हवा!