Tag: Parody poem

  • येतात घरी हे जेव्हा – YETAAT GHAREE HE JEVHAA

    संदीप खरे यांच्या नसतेस घरी तू जेव्हा’ या सुंदर भावपूर्ण कवितेवर हे सहज सुचलेले विडंबन नसतात घरी हे जेव्हा… मी चॅटींग करीत बसते दाराशी चाहूल ह्यांची मी त्वरीत ऑफलाईन होते येतात घरी हे जेव्हा… मग जेव्हा वाजे बेल अंतरी साठवित बोल मोबाइल मौनी होतो मी हसून उघडे दार येतात घरी हे जेव्हा … सय मला…

  • पावश्या घूम – PAAVASHYAA GHOOM

    मूळ बाल-कविता – ये रे ये रे पावसा(कवी-अनामिक) घूम घूम पावश्या चारा देती मावश्या चारा आहे मऊ पाऊस तुझा भाऊ ये रे ये रे भावा भाषा शीक जावा भाऊ शिकला भाषा पणजा गुंडाळी गाषा…

  • उदरभरण – UDAR BHARAN

    This poem is known as haasya-kavita. Such type of poems, some times look funny but sometimes we must think over them more seriously and with positive attitude. सामोशाला तळे जरी ती हात भाजले त्याचे ग मिरची आणिक चटणी संगे खात राहिले सारे ग गोल त्रिकोणी शंकू सम ते रंग बदामी त्यांचा रे शुभ्र मनाने खाता…

  • काटेवांग्यापरी – KAATE-VAANGYAAPAREE

    काटेवांग्यापरी काकडी हट्ट केवढा धरी तिखट मिठाचे सारण करुनी भरना तू अंतरी चूल पेटवून ठेव भगूणे तेल घाल तू अदमासाने कडकडनाणाऱ्या  तेलामध्ये घाल जिरे मोहरी हिंग हळदीची घाल फोडणी हलवुन फोडी उदक सोडुनी खिरा काकडी वाळूक असुदे वाफ तया दे खरी लखलखणारे ताट धातुचे भरले वाळूक वाढ चवीचे ठेव जोडीला गोड लोणचे जेवीन आज घरी

  • ऐक बुवा – AIK BUVAA (LISTEN MAN )

    विडंबन काव्य-तुज कष्ट नको पण दाम हवा, मूळ कविता-मज नकोत अश्रू घाम हवा, गीतकार-कविवर्य ग.दि.माडगुळकर, तुज कष्ट नको पण, दाम हवा! हा तव तंत्रांचा, साम नवा! दुध तपवुनी, साय जमवुनी, विरजुन, घुसळुन, मिळते लोणी! तूप मिळव तू, त्यास कढवुनी, हे बाईचे तू, ऐक बुवा! तुज कष्ट नको पण दाम हवा! ठेव क्षीर तू, मंदाग्नीवर, बोटांमध्ये,…

  • घरात मी – GHARAAT MEE (am in the house)

    The poem ‘Gharaat mee’ is based on the poem ‘Havaas too(हवास तू गीत-जगदीश खेबुडकर संगीत-सुधीर फडके स्वर-आशा भोसले चित्रपट-आम्ही जातो आमुच्या गावा). This poem is a parody poem or Vidamban kaavya(विडंबन काव्य) घरात मी, भरात तू, करात मज तू, हवास तू विमानातुनी, मम काव्याची, काढशील का, वरात तू फुलांपरी मम, कोमल गझला, वामा विमला, श्यामा…

  • मद्यपी – MADYAPI (DRINKER)

    थाळीभवती कितीक चमचे तू तर काटेपळी … किती हुडकिशी तव काट्यांनी या थाळीच्या तळी ? पळी रुपेरी म्हणे वाढप्या, “शिकार दिसते बरी! चिनी जपानी खाद्यामधली जाड शेवई खरी” “तर्र मद्यपी अंधारातही चोरतील ग तुला” म्हणे वाढपी पळीस टोचऱ्या “नकोस टोचू मला! भुलून गेलो तुज पुसताना तुझिया रंगावरी, खरी तरतरी दिसे सुंदरी माझ्या गालावरी”