In this poem the poetess describes the procedure (रेसिपी) of making Rose-balls(Gulab-jamun).
शुगर शर्करा शक्कर चीनी
ढवळ पाक जल साखर तपवुनि
खव्यात मैदा सोडा मिसळुनि
पिठास मळ त्या फेटफेटुनी
मृदूल तळवे फिरव फिरवुनी
चेंडूसम मग जाम बनवुनि
शुद्ध तुपाला उकळी आणुनी
तळुन रंग दे त्यास जामुनी
गुलाबजामुन सच्छिद्र करुनि
पाक त्यावरी ओत भरूनी
बाउलमध्ये ठेव सजवुनी
सर्वांना तू वाढ हसूनी