अंक सर्व मज आवडती
नाही कुठला नावडता
ओळख करुनी घेते मी
त्यांच्याशी जाता जाता..
शून्य शून्यमय विश्वाचा
एक आपुल्या जीवाचा
दोन जीव नि अजीवाचा
तीन खऱ्या ‘रत्नत्रय’ चा
चार चार पुरुषार्थांचा
पाच पंच परमेष्ठींचा
सहा सहाही द्रव्यांचा
सात असे सत-तत्वांचा
आठ अष्टमूलगुणांचा
नऊ नवरसी काव्याचा
दहा पर्व दशधर्माचा…
जीवांच्या कल्याणाचा
धर्म अहिंसा विश्वाचा…