प्रतिमा माझी मस्त मस्त पण मस्त त्याहुनी आहे मीच
काया माझी चुस्त चुस्त पण चुस्त त्याहुनी आहे मीच
कामांधांना बुभुक्षितांना शिस्त लावण्या जागी मीच
रातराणिच्या अवती भवती गस्त घालण्या जागी मीच
नैवेद्याचे ताट पूर्ण हे फस्त कराया आले मी ग
धान्य-धुन्य अन भाजीपाला स्वस्त कराया आले मी ग
गवतमधल्या तणा माजल्या नष्ट कराया जिजीविषा मी
पुन्हा बालिका तरुणी होउन कष्ट कराया जिजीविषा मी
तू तू करुनी मी स धराया कशास बिचकू आता मी र
म्हणेन ये ये अथवा यू यू कशास टरकू आता मी र
मात्रावृत्त(८+८+८+७=३१ मात्रा)