This is a parody poem based on the original poem ‘yenar naath aataa(येणार नाथ आता). येणार नाथ आता is a famous marathi film song.
In this parody poem the poetess says, Kojagiri night showered with milky light of full moon will give us so many beautiful things and our hands will take this natures gift with happy mind.
देणार रात आता
घेणार हात आता
निशिगंध रातराणी, पाण्यात चंद्रबिंब
तव सूर बासुरीचे, गंधात चिंबचिंब
तुजला खरीखुरी रे, देणार साथ आता
वेचेन चांदणे मी, शब्दात सांडलेले
उमलेल गीत अधरी, हृदयात साठलेले
नेत्रातल्या दिव्यांची, फुलणार वात आता
ही प्रेमरूप पर्णे, हळुवार बांधते मी
अनमोल काव्यपुष्पे, धाग्यात गुंफते मी
अर्पेण सर्व नाथा, सरणार रात आता