Category: Ghazal

  • अघहर – AGHAHAR (purifier)

    वय माझे बघ झाले सत्तर भेटायाला आले जलचर फुलात दडला सुगंध हो तू हवा वाहण्या चंचल नवथर मूर्त घडवशिल केव्हा माझी प्रश्न पुसाया येतिल पत्थर पदर उडे वाऱ्यावर रमणी नकोच होऊ कातर सावर जिनास वंदन करते बालक बिंब सावळे आहे अघहर गझल मात्रावृत्त – (मात्रा १६)

  • स्वप्न निळे – SWAPN NILE (blue dream)

    डोईवरती पंखा लाल जास्वंदीचे जणु ते गाल किनार काळी पंखाकार फांदीवरती पक्षी बाल पाने गाती वसंत गान झुळझुळ वारा देतो ताल सांग कोणता गाऊ राग उजळ उजळ बघ माझे भाल घेता खग कंठातुन तान अवखळ निर्झर बदले चाल विहगा गगनी घेऊन झेप लूट घनातिल मौक्तिक माल मेंदी रंगी स्वप्न निळे बघत रहा पांघरुन शाल गझल…

  • म्यूट – Mute

    वागणे बेछूट आता सोडुनी दे सूट आता सोड काथ्याकूट आता सेल ठेवुन म्यूट आता भाजले मी शेंगदाणे कर तयांचा कूट आता चक्रव्यूहा भेद बाणा उलगडाया कूट आता पांघरोनी घोंगड्याला चोरटयांना लूट आता संपले अवतार मिथ्या तू इथूनी फूट आता रिक्त जागा भर सुगंधे भरुन याया तूट आता गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा १४) लगावली –…

  • ऐट – (swagger)

    सावलीची कैक बाळे बाळ छाया स्वैर बाळे तू जरासे ऊन पांघर रापण्याला ऐक बाळे शीक सत्याचीच भाषा मिथ्य आहे गैर बाळे कष्ट झाले फार आता कर जरा तू ऐश बाळे फिर सुनेत्रा छप्परातुन दाव त्यांना ऐट बाळे गझल – अक्षरगणवृत्त (मात्रा १४) लगावली – गालगागा/गालगागा/

  • फुले – (flowers)

    राजहंस दो निळे सरोवर डोंगरमाथ्यावर शिवशंकर हिरवी हळदी कुंकुमवर्णी आठवणींची फुले धरेवर सुंदर गोष्टी ना क्षणभंगुर अक्षय झरणारे ते निर्झर खळाळत्या भावना झर्याच्या तयात हसते निळसर अंबर काठावरच्या लता वल्लरी जलात बघती अपुले अंतर बदके लाटांवरती आरुढ ओढा जणु भरतीचा सागर लाटांमधली हवा काढण्या तुझा सुनेत्रा आहे संगर गझल मात्रावृत्त – मात्रा १६

  • स्याद्वाद आहे – SYAADVAAD (relativity of knowledge)

    निर्झराचा नाद आहे ही जलाची साद आहे उमटते जी कागदावर ती प्रियेची दाद आहे प्राशुनी मी काव्यगंधा चाखला तव स्वाद आहे पूर्ण जाणे आत्मियाला तो खरा स्याद्वाद आहे मैत्र जडता पाखरांशी गूज अन संवाद आहे नासवीले दूध त्याने त्यास तो मोताद आहे मायभूचा करुन सौदा जाहला बरबाद आहे रंगती गप्पा स्मृतींच्या माजतो तो वाद आहे…

  • शर्वरी – (the night)

    दाटता आभाळ काळे नाच नाचे शर्वरी घालुनी पायात वाळे नाच नाचे शर्वरी बोलणे टाळे अताशा व्यर्थ काथ्याकूट तो लावुनी ओठांस टाळे नाच नाचे शर्वरी उमटता सौदामिनीची सागरावर अक्षरे सागरी लाटांस चाळे नाच नाचे शर्वरी गडगडाटी युद्ध होता सावळ्या जलदांतले सोदण्याने नीर गाळे नाच नाचे शर्वरी तीन दगडांच्या चुलीवर पात्र भरले ठेवुनी वाळल्या काष्ठांस जाळे नाच…